शहरं
Join us  
Trending Stories
1
Pope Francis: पोप फ्रान्सिस यांचं निधन, दीर्घ आजारपणानंतर व्हॅटिकन सिटी येथे घेतला अखेरचा श्वास
2
टॅरिफनंतर ट्रम्प यांचा नवा आदेश, ८ मुद्द्यांची 'नॉन-टॅरिफ फ्रॉड' यादी जाहीर
3
हद्दच झाली...! मित्रांनी नवरा-नवरीला निळा ड्रम गिफ्ट केला; दहशतीत असलेले सगळे वऱ्हाडी पाहू लागले
4
"मी लॉरेन्स बिश्नोईचा माणूस, तुला गोळी घालेन", रुबीना दिलेकच्या नवऱ्याला जीवे मारण्याची धमकी
5
व्यापारयुद्ध, चीन...भारतासाठी जेडी व्हेन्स यांचा दौरा महत्वाचा; पीएम मोदी कोणते मु्द्दे मांडणार?
6
Vastu Tips: घरात मनी प्लांट आहे पण आर्थिक लाभ होत नाही? नक्कीच होत आहेत 'या' चुका!
7
साईचरणी ७५ लाखांचा सुवर्ण मुकुट अर्पण; कुटुंबाकडून ओळख गुप्त ठेवण्याची विनंती
8
गायीच्या शेणात असं काय खास आहे? जे खरेदी करण्यासाठी अरब देशांनी लावल्या रांगा
9
Karnataka Murder: 'आई आणि बहीण रोज वडिलांशी भांडायची, जीवे मारण्याची दिलेली धमकी'; मुलाचा मोठा दावा
10
Rishabh Pant चं नशीब फळफळलं!! आधी २७ कोटींची बोली, आता BCCIच्या करारतही मिळाली बढती
11
Vastu Tips: आपल्या वास्तूची दृष्ट कधी व कशाने काढावी? त्यामागे शास्त्र काय? जाणून घ्या!
12
Pope Francis: किती श्रीमंत होते पोप फ्रान्सिस, आपल्या मागे किती सोडली त्यांनी संपत्ती?
13
पोलिसांनी काठी मारली, दुचाकीवरील महिला तोल जावून डंपरखाली सापडली, जागीच मृत्यू   
14
बीसीसीआयनं केंद्रीय करारातून लॉर्ड शार्दुल ठाकूरचं नाव वगळलं!
15
"एका रात्रीत सर्व उद्ध्वस्त, आमच्याकडे ना दुकान आहे ना जमीन; सरकारला विनंती करतो की..."
16
ब्राह्मण असून २ लग्न का केली? अभिनेत्याचं वादग्रस्त वक्तव्य, म्हणाला- "रामाच्या वडिलांच्या ३ बायका होत्या..."
17
बाजारात ५०० रुपयांच्या बनावट नोटांचा सुळसुळाट, थोडीशी नजरचूक पडू शकते महागात, सरकारने दिला अलर्ट 
18
Ajit Pawar: 'रिक्षात पुरुषाला बसवलं तर त्याचा फोटो काढा', अजितदादांच्या महिलांना सूचना
19
WhatsApp वर चुकूनही असे फोटो डाउनलोड करू नका; तुमचे बँक खाते होईल रिकामे
20
भारताचे जावई अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष म्हणून पहिल्यांदाच सासरी आले; ट्रेड वॉरची भेट देणार की नेणार?

नागरिकांना मारणे टोळीविरुद्ध तक्रार करण्यासाठी गुन्हे शाखेत एक कक्ष सुरू होणार - अमितेश कुमार

By नम्रता फडणीस | Updated: February 25, 2025 19:46 IST

तक्रार करणाऱ्या नागरिकांचे नाव गोपनीय ठेवण्यात येणार असल्याचे आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले

पुणे: कोथरूड भागात संगणक अभियंता देवेंद्र जोग यांना मारहाण करुन खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी मारणेसह साथीदारांविरुद्ध दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्याचा तपास कोथरूड पोलिसांकडून गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला आहे. नागरिकांना मारणे टोळीविरुद्ध तक्रार करण्यासाठी गुन्हे शाखेत एक कक्ष सुरू करण्यात येणार असून, मारणे विरुद्ध तक्रार असल्यास नागरिकांनी गुन्हे शाखेकडे तक्रार करावी, असे आवाहन पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी केले आहे. गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त निखिल पिंगळे या कक्षाची जबाबदारी सांभाळणार आहेत. तक्रार करणाऱ्या नागरिकांचे नाव गोपनीय ठेवण्यात येणार आहे, असेही आयुक्तांनी सांगितले.            गुन्हे शाखेकडून ७४ ठिकाणी छापे

गुन्हे शाखेच्या पथकाकडून मंगळवारी ७४ ठिकाणी छापे टाकण्यात आले. मारणे याने कोथरूड मधील शास्त्रीनगर भागात केलेल्या घराच्या बांधकामाची माहिती घेण्यात आली आहे. तसेच मारणे याच्यासह साथीदारांच्या मालमत्तांची माहिती पोलिसांकडून संकलित करण्यात येत असून, ते वापरत असलेल्या वाहनांची माहिती प्रादेशिक परिवहन विभागाकडून घेण्यात आली आहे.

३७ वर्षात २८ गुन्हे, दोनदा तडीपार, मोक्काची कारवाई

गुंड गजा मारणे याच्यावर गेल्या ३७ वर्षात तब्बल २८ गंभीर गुन्हे दाखल आहेत. राजकीय वरदहस्त असलेल्या या गुंडाला दोनदा तडीपार केले होते. तसेच यापूर्वी चार वेळा मोक्का अंतर्गत कारवाई केली होती. तळोजा कारागृहातून सुटल्यानंतर त्याच्या समर्थकांनी ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’वर त्याची आलिशान कारमधून भव्य मिरवणूक काढली होती. या मिरवणुकीद्वारे त्याने एकप्रकारे पोलिसांना शह दिल्याचे मानले गेले.

वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात २८ गुन्हे दाखल

गजा मारणे याच्यावर आतापर्यंत डेक्कन, कोथरूड, सासवड, दत्तवाडी, पौड, कामोठा, शिरगाव, हिंजवडी, भारती विद्यापीठ पोलिस ठाणे अशा वेगवेगळ्या पोलिस ठाण्यात २८ गुन्हे दाखल आहेत. पुढे एकेकाळचा मित्र असलेला नीलेश घायवळ याच्याशी गजा मारणेचे शत्रुत्व निर्माण झाले. बाबा बोडके याच्याशी देखील त्याचे शत्रुत्व निर्माण झाले. त्यातून या टोळ्यांमध्ये टोळीयुद्ध भडकले होते.

टॅग्स :Puneपुणेkothrud policeकोथरूड पोलीसcommissionerआयुक्तCourtन्यायालयCrime Newsगुन्हेगारीArrestअटक