शहरं
Join us  
Trending Stories
1
‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
2
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
3
"एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांना माहीत आहे की..."; महायुतीच्या CM पदाच्या चेहऱ्यावरून ओवेसींचं मोठं विधान
4
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट
5
अमित ठाकरेंची कोंडी? सदा सरवणकर थेट पंतप्रधान मोदींना भेटले; वाकून नमस्कार केला अन्...
6
मी माझ्या नुकत्याच जन्मलेल्या बाळाला गमावलं! बॉलिवूड गायकाने सांगितला कठीण काळ, म्हणाला- "त्याचा मृतदेह..."
7
“राजकारण आम्हालाही येते, देवेंद्र फडणवीस गोंधळलेत, त्यांना काहीच माहीत नव्हतं”; संजय राऊतांची टीका
8
उघडण्यापूर्वीच 'हा' IPO पुढे ढकलला, ग्रे मार्केटमध्ये नफ्याचे संकेत; प्राईज बँड ₹१४७, कारण काय?
9
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
10
जया बच्चन यांना हसताना पाहून नेटकरी चकित, आगामी सिनेमाच्या पोस्टरमध्ये वेगळाच लूक
11
अबब! इतक्या मिनिटांचा असणार 'पुष्पा २'चा ट्रेलर; सिनेमाच्या टीमने दिली मोठी माहिती
12
'डायरिया असताना पावसात शूट केलं रोमँटिक गाणं, वॉशरुमही...' मिनाक्षी शेशाद्रीने सांगितली आठवण
13
Zomato १ अब्ज डॉलर्सचा QIP लाँच करण्याची शक्यता, पाहा काय आहे कंपनीचा प्लान?
14
Maharashtra Election 2024 Live Updates: ‘आम्ही हे करू’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरे म्हणाले...
15
'प्रथम महाराष्ट्र, मग पक्ष, शेवटी स्वतः!' केवळ उक्ती नव्हे, कृतीतून सिद्ध करणारे देवेंद्र फडणवीस
16
आधी ‘बटेंगे तो कटेंगे’ला विरोध, आता मोदींच्या सभेला दांडी, अजित पवारांच्या मनात चाललंय काय?  
17
IND vs SA: मालिका जिंकण्यासाठी मोठा निर्णय? Rinku Singh संघाबाहेर, 'या' स्टार खेळाडूला संधी
18
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
19
पोलिसांनी शूटरलाच विचारले ‘कोणाला पाहिलं काय?’; बाबा सिद्दिकी प्रकरणातील धक्कादायक माहिती उघड
20
गजकेसरी योगात सूर्य-शनी गोचर: ७ राशींना अनुकूल, सकारात्मक काळ; लक्ष्मी कृपा अन् यश प्रगती!

Ashadhi Wari: आळंदीत जमला वैष्णवांचा मेळा; जाणून घ्या कसा होणार पालखी प्रस्थान सोहळा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2023 12:05 PM

टाळ - मृदुंगाचा निनाद, ‘ज्ञानेश्वर महाराजांचा अखंड जयघोष’, आणि भगवा झेंडा उंचावत वारकऱ्यांमुळे समस्त अलंकापुरी भक्तिरसात न्हाऊन निघाली

आळंदी :  टाळ - मृदुंगाचा निनाद, ‘ज्ञानेश्वर महाराजांचा अखंड जयघोष’, आणि भगवा झेंडा उंचावत फेर - फुगड्यामध्ये देहभान विसरून नाचणाऱ्या वारकऱ्यांमुळे समस्त अलंकापुरी भक्तिरसात न्हाऊन निघाली आहे. आज सायंकाळी चार वाजता माउलींच्या पालखी सोहळ्याचे मुख्य मंदिरातून पंढरीकडे प्रस्थान होणार आहे. यापार्श्वभूमीवर प्रस्थान पूर्वीची संपूर्ण तयारी पूर्ण झाल्याची माहिती देवस्थान कमिटीने दिली

श्री. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या आषाढी पायीवारी सोहळ्यासाठी राज्यासह इतर राज्यातून लाखों भाविकांचा महामेळा अलंकापुरीत जमला आहे. इंद्रायणी घाट, सिध्दबेट, हैबतबाबा पायरी, पुंडलिक मंदिर, नृसिह सरस्वती महाराज मंदिर, संत जलाराम मंदिर, राघवदास महाराज, ज्ञानेश्वर भिंत, साईबाबा मंदिर, गजानन महाराज मंदिर, पद्मावती मंदिर, गोपाळपुरा, विश्रांतवड आदी ठिकाणी भाविकांची गर्दी झाली आहे.

  तत्पूर्वी शनिवारी (दि.१०) संत तुकाराम महाराज पालखीच्या प्रस्थानासाठी अनेक वारकरी देहूनगरीकडे मार्गस्थ झाले होते. संत तुकाराम महाराजांचा प्रस्थान सोहळा झाल्यानंतर अनेक वारकरी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या प्रस्थान सोहळ्यात सहभागी होण्यासाठी रात्रीपासून आळंदीत दाखल होत आहेत. त्यामुळे सोमवारी  आळंदीत गर्दीचा उच्चांक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

असा असेल प्रस्थान सोहळा 

*  रविवारी पहाटे ४ वा. घंटानाद. ४.१५ काकडा. पहाटे ४.१५ ते ५.३० पवमान अभिषेक, पंचामृत पूजा व दुधारती.  ५ ते सकाळी ९ पर्यंत भक्तांच्या महापूजा व समाधी दर्शन. *    सकाळी ९ ते १२ पर्यंत भाविकांना समाधीस्थळाचे दर्शन व वीणा मंडपात कीर्तन. दुपारी १२ ते १२.३० गाभारा स्वच्छ करणे, समाधीस पाणी घालणे व श्रींना महानैवद्य. दुपारी १२.३० ते २ पर्यंत भाविकांना समाधीचे दर्शन.* दुपारी २.३० ते ३ वाजता प्रस्थान सोहळ्याच्या मानाच्या ४७ दिंड्यांना मुख्य महाद्वारातून प्रवेश. दरम्यान श्रींना पोशाख घालण्यात येईल.* सायं. ४ वाजता मुख्य प्रस्थान सोहळ्याला सुरुवात. * श्रीगुरु हैबतबाबा यांच्या तर्फे श्रींची आरती. त्यानंतर संस्थांची आरती, नारळ प्रसाद व विधिवत मानपानाचा कार्यक्रम.*    माऊलींचे मानाचे दोन्ही अश्व मंदिरात प्रवेश करतील. विणामंडपात पालखीमध्ये श्रींच्या चल पादुका प्राणप्रतिष्ठापित केल्या जातील. दरम्यान संस्थांतर्फे मानकऱ्यांना मानाची पागोटी वाटप करण्यात येईल.* त्यानंतर पालखी महाद्वारातून प्रस्थान ठेऊन प्रदक्षिणा मार्गाने हा सोहळा आजोळघरी (दर्शनमंडप इमारत) पहिल्या मुक्कामी स्थिरावेल. * रात्री ११ ते ४.३० जागर.

 आळंदीत आरोग्य दिंडी... 

ज्ञानेश्वर महाराज आषाढी पालखी सोहळ्यानिमित्त आरोग्य दिंडी काढण्यात आली. पुणे जिल्हा परिषद ,पुणे आरोग्य विभागाचे सर्व कर्मचारी, ग्रामीण रुग्णालय आळंदी येथील सर्व वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी दिंडीत सहभागी  झाले होते. टाळ, मृदंगाच्या गजरात व ज्ञानोबा - माऊलींच्या जयघोषात या दिंडीने आरोग्य विषयी वारकऱ्यांमध्ये जनजागृती केली. विशेषतः उष्माघात जणजागरण, हिवताप, डेंग्यु, जणजागरण, क्षयरोग, कुष्ठरोग इत्यादी आरोग्य विषयक जोखमीच्या विषयांची फलकांद्वारे माहिती देण्यात आली.

टॅग्स :Puneपुणेashadhi wariआषाढी एकादशीची वारी 2022sant dnyaneshwar palkhiसंत ज्ञानेश्वर पालखीAshadhi Ekadashiआषाढी एकादशी