शहरं
Join us  
Trending Stories
1
सरवणकरांचं कौतुक, राज ठाकरे, बाळा नांदगावकरांवर टीका; ठाकरे गटाचे उमेदवार काय म्हणाले?
2
मराठीसाठी लढणाऱ्या पक्षाचे ६ नगरसेवक चोरताना महाराष्ट्रद्रोह नव्हता का?; मनसेचा थेट सवाल
3
'आम्ही त्यांच्याविरोधात प्रचार करू', नवाब मलिकांच्या उमेदवारीवर आशिष शेलार स्पष्ट बोलले...
4
"विश्वासाने जबाबदारी, सत्ता दिली, पण त्यांच्याकडून दुर्दैवाने गैरफायदा घेतला गेला"
5
तिरुपती बालाजी मंदिरातील सर्व कर्मचारी हिंदू असावेत, नवनियुक्त TTD अध्यक्षांचे मोठे विधान
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेतील अपक्ष अर्ज मागे घेणार का? भाजपा नेते सम्राट महाडिक म्हणाले, ;माघारीचा निर्णय कार्यकर्त्यांशी..."
7
IPL मधील ४ कॅप्टन ज्यांना फ्रँचायझी संघानं दिला 'नारळ'
8
Maharashtra Election: "आम्ही फोडणार नाही, पण करेक्ट कार्यक्रम करणार"; सतेज पाटलांचा इशारा
9
नव्या परिवर्तनाकडे चला..! मनोज जरांगे पाटलांचं मुस्लीम-मराठा-दलित समाजाला आवाहन
10
शरद पवार, काँग्रेसने उद्धव ठाकरेंना फसवले; बावनकुळेंनी करून दिली युतीच्या जागावाटपाची आठवण
11
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, कार समोरील वाहनाला धडकली; तीन जण जागीच ठार, तीन जखमी
12
IPL Retention List : अखेर घोषणा झाली! अनेकजण लिलावात; कोणी कोणाला केलं रिटेन? वाचा यादी, विराट मालामाल
13
बापरे! दिवाळीची साफसफाई करताना चुकून कचऱ्यात फेकलं ४.५ लाखांचं सोनं; झालं असं काही....
14
महाराष्ट्रात कुणाची हवा? समोर आलेला हा नवा सर्व्हे भाजपची झोप उडवणारा अन् CM शिंदेंचंही टेन्शन वाढवणारा!
15
IPL 2025 : रोहित की हार्दिक! मुंबई इंडियन्सचा कॅप्टन कोण असणार? फ्रँचायझीची मोठी घोषणा
16
वन नेशन वन इलेक्शन आणि UCC कधीपासून येणार? पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले,...
17
MI नं बुमराहसाठी मोजली मोठी रक्कम; रोहित-हार्दिकसह सूर्याला किती कोटींमध्ये केलं रिटेन?
18
"दीपोत्सवाचं निमंत्रण नाही", अयोध्येच्या खासदाराचा गंभीर आरोप; भाजपाचा पलटवार, म्हणाले...
19
"पवार साहेब, ही तुमची गद्दारी आहे"; सदाभाऊ खोतांनी शरद पवारांवर चढवला हल्ला
20
भाजपने आठ विधानसभा मतदारसंघात बदलले उमेदवार; 'या' विद्यमान आमदारांचा पत्ता कट

अजबच! १८६ रुपयांत लाटणार होता ११.२६ कोटी; शेतकऱ्याकडे तब्बल ११ हजार एकर जमीन पडताळणीत उघड

By नितीन चौधरी | Published: October 08, 2023 10:10 AM

नुकसान भरपाईसाठी पात्र ठरला असता, तर त्याला केवळ १८६ रुपयांच्या विमा रकमेत तब्बल ११ कोटी २८ लाख रुपयांचा लाभ झाला असता. 

पुणे  : एका शेतकऱ्याकडे तब्बल साडेचार हजार हेक्टर अर्थात ११ हजार एकर जमीन आहे. विश्वास बसत नाही ना? या शेतकऱ्याने या सर्व जमिनीवर सोयाबीन लावले आहे, तेही तब्बल २८ जिल्ह्यांमध्ये. कृषी विभागाने खरीप पीकविमा योजनेत केलेल्या शेतकऱ्यांच्या पडताळणीत हा पठ्ठ्या सापडला. नुकसान भरपाईसाठी पात्र ठरला असता, तर त्याला केवळ १८६ रुपयांच्या विमा रकमेत तब्बल ११ कोटी २८ लाख रुपयांचा लाभ झाला असता. 

त्या मोबदल्यात त्याने सरकारला ४ कोटींचा चुना लावला असता. प्रधानमंत्री खरीप पीकविमा योजनेत २१ दिवसांपेक्षा जास्त खंड असलेल्या मंडळांमध्ये १८ जिल्ह्यांत अधिसूचना जारी करण्यात आली आहे. कृषी  विभागाकडून पडताळणी करताना ही बाब उघड झाली. हा पठ्ठ्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील आहे.

कारवाईचे आदेश -त्याच्याकडे स्वत:चे सामाईक सुविधा केंद्र (सीएससी) आहे. या केंद्रावरूनच त्याने हा उद्योग केला. त्याने त्याचे वडील व आजोबांच्या नावावरही विमा काढला. त्याच्यावर गुन्हा दाखल करून कारवाईचे आदेश देण्यात येणार आहेत.

२८ जिल्ह्यांत जमीन त्याने २८ जिल्ह्यांमध्ये जमीन असल्याचे दाखवत विम्यासाठी १८६ अर्ज केले. यातील ५० अर्जांमधून त्याने संभाजीनगर जिल्ह्यात १ हजार २२१ हेक्टर जमीन दाखवून ६ कोटी ९ लाख ६५ हजार ८७५ रुपयांचा विमा काढला. 

बीड जिल्ह्यात ३१ अर्जांमधून ५८३ हेक्टर जमीन दाखवून ३ कोटी ४ लाख ३५ हजारांचा विमा उतरवला. हिंगोलीत १४ अर्जांद्वारे ४९० हेक्टर व लातूरमध्ये १४ अर्जांतून ३८० हेक्टर जमीन दाखवली. 

या पठ्ठ्याने २८ जिल्ह्यांमध्ये ४ हजार ५१८.३९ हेक्टर अर्थात ११ हजार २९५ एकर जमीन असल्याचे दाखवले आहे. या २८ जिल्ह्यांपैकी चंद्रपूर, जळगाव, नाशिक, सातारा, सोलापूर या जिल्ह्यांतील विमा उतरवलेल्या जमिनीचे क्षेत्र अजून ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीकडून उपलब्ध झालेले नाही. हा आकडा ५ हजार हेक्टरच्या वर जाईल.

सोयाबीनचीच सगळीकडे नोंद - साडेचार हजार हेक्टर जमिनीवर सोयाबीनचे पीक दाखवून पठ्ठ्याने २२ कोटी ५७ लाख ४३ हजार १७८ रुपयांचा विमा काढला. - त्यासाठी राज्य सरकारला शेतकरी हिश्श्यापोटी सुमारे ३ कोटी ९८ लाख ६५ हजार ८५४ रुपये विमा कंपन्यांना द्यावे लागणार होते. - अर्थात या पठ्ठ्याने राज्य सरकारला चार कोटींंना गंडवले असते.- नुकसानभरपाईचे निकष लागू झाल्यास ५० टक्के भरपाईपोटी ११ कोटी २८ लाख ७१ हजार ५८९ रुपयांचा लाभ मिळाला असता.

टॅग्स :fraudधोकेबाजीFarmerशेतकरीMONEYपैसा