पुणे - कोंढवा भागात तरुणीवर सामूहिक बलात्काराची घटना ताजी असताना आता याच भागातील एका सोसायटी मधील पाच वर्षाच्या मुलावर तीन अल्पवयीन मुलांनीच अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. यामध्ये १३, ११ आणि १० वर्षाच्या तीन मुलांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांना ताब्यात घेऊन बाल न्याय मंडळात पोलिसांनी हजर केले आहे.
याप्रकरणी पीड़ित मुलांच्या पालकांनी कोंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार व विधिसंघर्षित मुले ही एकाच सोसायटीत राहतात. तक्रारदार यांना पांच वर्षाचा मुलगा आहे. तो मुलगा त्यांच्या सोसायट्यामधील मुलांसोबत खेळत होता. मुलांनी मोबाईलवरील व्हिडिओ पाहिल्यानंतर त्याप्रमाणेच त्यांनी कृत्य केले. पांच वर्षाच्या मुलाचे कपडे काढून त्यांनी त्याच्यासमवेत अनैसर्गिक कृत्य केले. हां प्रकार वारंवार घडल्याचे पालकांना समजल्यानंतर त्यांनी पोलिस ठाण्यात या अल्पवयीन मुलांविरोधात तक्रार केली. पोलिस उपनिरीक्षक शेख या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.