पुणे : मैत्री तोडल्याच्या रागातून मित्राने मैत्रिणीच्या नावे सोशल मीडियावर बनावट अकाऊंट उघडले. त्यानंतर मैत्रिणीचे अश्लील फोटो अपलोड करून शिवीगाळ केली. याप्रकरणी २१ वर्षीय पीडितेने दिलेल्या फिर्यादीवरून २४ वर्षीय आरोपी मित्राविरोधात कोथरूड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २१ वर्षीय पीडितेने आरोपीसोबत मैत्री तोडली. त्याचा राग मित्राला आला. त्याने सोशल मीडियावर तिच्या नावे बनावट अकाऊंट ओपन केले. त्यानंतर पीडितेचे अश्लील फोटो अपलोड करून कॉलगर्ल असा उल्लेख करत शिवीगाळ केली. यानंतर पीडितेच्या व्हॉट्सअप मेसेज करत देखील अश्लील भाषेत शिवीगाळ केली.तसेच पोलिसात तक्रार केली तर तुला मारून टाकेल अशी धमकी देखील दिली. हा प्रकार ३१ ऑक्टोबर ते १७ नोव्हेंबर २०२४ या कालावधीत घडल्याचे पीडितेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक (गुन्हे) विक्रमसिंह कदम करत आहेत.
पुणे क्राईम : मैत्री तोडल्याच्या रागातून मित्राने बनावट अकाऊंट ओपन करत केले अश्लील मेसेज
By नितीश गोवंडे | Published: November 19, 2024 11:16 AM