किवळे : बंगळुरू -मुंबई महामार्गालगत किवळे येथे लाकडी सामानाच्या दुकानाला रात्री सव्वादहाच्या सुमारास आग लागली. आगीत लाकडी सामान, फर्निचर सामानाचे व लाकडाचे मोठे नुकसान झाले असून काही लाकडे जळून जाळून खाक झाली असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.
महापालिकेच्या निगडी, संत तुकाराम नगर व थेरगाव येथील अग्निशमन दलाचे जवान आग विझवण्याचे प्रयत्न करत आहेत. दरम्यान, चार बंब घटनास्थळी उपस्थित आहेत. आग विझविण्यासाठी लाकडी सामान व प्लायवुड हलविण्यासाठी राजेंद्र तरस यांनी जेसीबी यंत्र उपलब्ध केले असून येथील तरुणांनी मदतकार्यात भाग घेतला आहे.
दरम्यान, अग्निशमन दलाच्या जवानांकडून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तर दुसरीकडे शेजारी असणारी इतर दुकाने या आगीपासून बचावली आहेत. सहायक पोलीस निरीक्षक कुंदा गावडे यांच्यासह पोलीस कर्मचारी दाखल झालेले असून त्यांनी सेवा रस्ता बंद करीत गर्दी पांगवली आहे.