शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
2
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
3
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
4
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
5
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
6
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
7
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
8
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
9
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
10
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
11
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
12
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
13
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
14
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
15
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
16
TATA IPL Auction 2025 Live: इशान किशन हैदराबादच्या ताफ्यात; SRH ने लावली 11.25 कोटींची बोली...
17
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
18
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?
19
बनावट ASP बनून फिरली, पोलिसांनी केलं सॅल्यूट; एक छोटीशी चूक होताच झाली पोलखोल
20
"नियोजनाप्रमाणे प्रचार केला नाही"; काँग्रेस नेत्याने शरद पवार-ठाकरेंवर फोडलं पराभवाचे खापर

विवाहित महिलेचे हात ओढणीने बांधून शेततळ्यात बुडवले; बारामतीतील घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2023 1:29 PM

विवाहितेचा मानसिक छळही करण्यात येत होता

सुपे : विवाहित महिलेचा शारीरिक व मानसिक छळ करीत तिचे दोन्ही हात ओढणीच्या साहाय्याने बांधुन शेततळ्यात बुडवुन खुन केल्याची घटना बारामती तालुक्यातील मासाळवाडी येथे घडली. सुरेखा भाऊसाहेब गडदरे असे खून झालेल्या विवाहीत महिलेचे नाव आहे. याप्रकरणी तिचा पती भाऊसाहेब महादेव गडदरे, सासू ठकूबाई महादेव गडदरे (रा. मासाळवाडी), नणंद आशा सोनबा कोकरे व नंदावा सोनबा चंदर कोकरे (रा. कुतवळवाडी, ता. बारामती) या चौघांना पोलिसांनी अटक केली आहे. 

 पोलिसांकडुन मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणी नामदेव बबन करगळ (रा. गिरीम, ता. दौंड) यांनी वडगाव निंबाळकर पोलिसांत फिर्याद दाखल केली. फिर्यादीची मुलगी सुरेखा हिला या चौघांनी शारिरिक, मानसिक छळ करत त्रास दिला. पती भाऊसाहेब व सासू ठकूबाई यांनी तिचे दोन्ही हात लाल रंगाच्या ओढणीने बांधून घराजवळील शेततळ्यात तिला पाण्यात बुडवून मारले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. रविवारी ( दि. २४ ) सकाळी सात वाजण्याच्या पूर्वी मासाळवाडीतील भगवान बिरा गडदरे यांच्या शेततळ्यात ही घटना घडली. दरम्यान बारामतीचे उपविभागिय पोलिस अधिकारी गणेश इंगळे यांनी घटनास्थळी भेट दिली. तर  सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक लवटे अधिक तपास करत आहेत.

टॅग्स :PuneपुणेBaramatiबारामतीmarriageलग्नhusband and wifeपती- जोडीदारCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस