पुणे : महापालिका हद्दीत नव्याने समाविष्ट झालेल्या ३४ गावांच्या मूलभूत सोयी सुविधांसाठी विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली ९ सदस्यीय समिती गठीत करण्यात आली आहे. याबाबत महाराष्ट्र शासनाच्या उप सचिव प्रियांका कुलकर्णी यांनी आदेश जारी केले आहेत.
सदर समितीमध्ये पांडुरंग एकनाथ खेसे (लोहगाव-वाघोली), बाबुराव दत्तोबा चांदेरे (सूस,म्हाळुंगे,बावधान), दत्तात्रय बबनराव धनकवडे (नऱ्हे,शिवणे,उत्तमनगर,धायरी), राकेश राजेंद्र कामठे (उंड्री,पिसोळी,वडाचीवाडी),भगवान लक्ष्मण भाडळे (मंतरवाडी,देवाची उरूळी), शांताराम रंगनाथ कटके (कटकेवाडी,वाघोली), गणेश बाळासाहेब ढोरे (ढोरेवस्ती,फुरसुंगी,बेकराईनगर), राहुल सदाशिव पोकळे (धायरी,पुणे) व अजित दत्तात्रय घुले (मांजरी बु.ता.हवेली) यांचा समावेश आहे.
महापालिका हद्दीत नव्याने समाविष्ट झालेल्या ३४ गावांमधील सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षेखाली १८ सदस्यीय समिती स्थापनेस शासनाकडून यापूर्वी मान्यता देण्यात आली होती. सदर समितीमध्ये आता नव्याने आणखी ९ सदस्यांचा समावेश करण्यात आला आहे.