शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Politics : राज की उद्धव? शरद पवारांनी त्यावेळीच दिलं होतं उत्तर; व्हिडीओ पुन्हा होतोय व्हायरल
2
काश्मीरमध्ये ऐन उन्हाळ्यात ढगफुटी; अचानक आलेल्या पुरात २ जण वाहून गेले, १०० लोकांना वाचविले
3
सोलापुरातील डॉ. शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरण; हॉस्पिटलमधील महिला प्रशासन अधिकाऱ्यास केली अटक
4
साप्ताहिक राशीभविष्य: ४ राशींना बक्कळ लाभ, ४ राशींना मध्यम फलदायी; बचतीत फायदा, यश-प्रगती!
5
अवघ्या ०.०१३ रनरेटमुळे वेस्टइंडीजचा संघ एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेतून बाहेर
6
इलॉन मस्क यांच्या आईने जिंकली भारतीयांचे मने; पंतप्रधान मोदींच्या ट्विटला दिलं होतं उत्तर
7
अमेरिकेला राजा नको...! हजारो अमेरिकन डोनाल्ड ट्रम्प विरोधात रस्त्यावर; हिटलरची उपमा...
8
लेख: वेळप्रसंगी आम्ही ‘भ’ची बाराखडी जाहीरपणे म्हणून दाखवतो...
9
राज-उद्धव एकत्र येण्याची चर्चा, मात्र मनसेनं घेतला असा पवित्रा, संदीप देशपांडे म्हणाले,"महाराष्ट्रासाठी एकत्र येणं म्हणजे…”,,
10
वधू-वरांनी एकमेकांना हार घातले; लग्नही झालं, पण, एका घटनेमुळे झाला घोळ, त्यानंतर...
11
मोबाइल सिग्नल वृद्धीसाठी मुंबई मेट्रोच्या आयबीएस सेवेचे दर दूरसंचार कंपन्यांना अमान्य
12
परभणीत लहान मुलांच्या वादातून दोन गटांमध्ये तुफान दगडफेक, वाहनांची नासधूस, शहरात तणावपूर्ण शांतता
13
बांगलादेशने तोडला इंदिरा गांधी-मुजीब उर रहमान यांच्या काळातील करार, सीमेवर केलं असं कृत्य 
14
विशेष लेख: तहव्वुर राणाला आणले, मेहुल चोक्सीचे काय? प्रत्यार्पणाचा इतिहास
15
"आता सुरूवात झालीय, येत्या काळात..."; देवेंद्र फडणवीसांचा महाविकास आघाडीला इशारा
16
विद्यार्थ्यांने धागा काढला नाही, म्हणून परीक्षेला बसवले नाही; कॉलेजच्या प्राचार्य अन् कर्मचाऱ्यांवर कारवाई
17
ट्रम्प यांच्या धोरणांविरुद्ध हजारो लोक रस्त्यावर उतरले, देशभर निदर्शनांची नवी लाट
18
सावध व्हा,  आलाय नवीन स्कॅम! तुम्ही तीर्थयात्रेचे पॅकेज ऑनलाइन बुक केले आहे का?
19
नियमांचे उल्लंघन कराल, तर वाळू डेपो होणार रद्द; महसूल मंत्र्यांचा इशारा

Blue Nawab: ब्लू नवाब या दुर्मिळ फुलपाखराचे सह्याद्रीमधील आंबोली जंगलात दर्शन

By श्रीकिशन बलभीम काळे | Updated: September 22, 2022 15:26 IST

महाराष्ट्रात हे फुलपाखरू दिसण्याची ही पहिलीच नोंद असल्याचा दावा अभ्यासकांनी केला....

पुणे : प्रदेशनिष्ठ आणि पश्चिम घाटातही दुर्मिळ असणारे ब्लू नवाब हे फुलपाखरू आंबोलीतील जंगलात पहायला मिळाले आहे. महाराष्ट्रात हे फुलपाखरू दिसण्याची ही पहिलीच नोंद असल्याचा दावा अभ्यासकांनी केला आहे. संवर्धनासाठी हे फुलपाखरांमध्ये उच्च स्थानी आहे, कारण हे खूपच दुर्मिळ आहे.

आबासाहेब गरवारे महाविद्यालयातील डॉ. अण्णासाहेब कुलकर्णी जैवविविधता विभाग प्रमुख डॉ. अंकुर पटवर्धन, प्रतीक्षा मेस्त्री, अथर्व दातार, मुकुल कुंटे, शिवानी कुलकर्णी, ऐश्वर्या शिर्के आणि फुलपाखरू अभ्यासक हेमंत ओगले हे आंबोलीत फुलपाखरांचा अभ्यास करत होते. तेव्हा प्रतीक्षा हिला तो ब्लू नवाब पहिल्यांदा दिसला. त्याचे छायाचित्र काढण्यात आले आणि यापुर्वीची नोंद तपासली. तेव्हा महाराष्ट्रात पहिल्यांदाच दिसल्याचे आढळून आले.

याविषयी डॉ. पटवर्धन म्हणाले, भारतात हे फुलपाखरू खूप दुर्मिळ आहे. सहसा दिसत नाही. त्याचा अधिवास खूप खास असतो. तो सदाहरित वनात नदीच्या काठी आढळतो. जिथे खूप झाडी असते. झरे, ओहोळ अशा ठिकाणी हे फुलपाखरू पहायला मिळते. त्या ठिकाणी याचा अधिवास असतो. याच्या तीन जाती आहेत. भारतात तीन ठिकाणीच दिसतात. ईशान्य भारतामध्ये खासी हिल्स येथे, मलबार प्रदेशात आणि पश्चिम घाटात. या फुलपाखराला शेड्युल वन मध्ये संरक्षण आहे. अतिसंरक्षण यादीत समावेश आहे.

फुलपाखरे आणि फुलणाऱ्या वनस्पतींमधील आवडी निवडी याबद्दल संशोधन करताना '' कापशी '' या वनस्पतीवर सुमारे ५० फुलपाखरांच्या प्रजाती भेट देताना दिसल्या. याशिवाय माशा, मधमाशा आणि पतंगाच्याही विविध जाती होत्या. पश्चिम घाटात ही कापशी वनस्पती दिसून येते.

आंबोलीचे जंगलात खूप जैवविविधता आहे. तिथे १९० हून अधिक फुलपाखरांच्या प्रजाती पहायला मिळतात. त्यात आता या दुर्मिळ ब्ल्यू नवाबची भर पडली आहे. तसेच इथे आॅटम लिफ आणि क्रुझर या दुर्मिळ फुलपाखरांचीही नोंद झाली आहे.

- डाॅ. अंकुर पटवर्धन, फुलपाखरू संशोधक

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्रAmboli hill stationआंबोलि हिल स्टेशन