शहरं
Join us  
Trending Stories
1
सहानुभूतीवर नाही, मविआचं जागावाटप मेरिटवरच होणार; नाना पटोलेंची रोखठोक भूमिका
2
"रामराजेंनी मला फोन केला, उद्या त्यांच्याशी..."; अजित पवारांनी सोडलं मौन
3
"महाराष्ट्रात 'खोके आणि धोके' सरकार"; प्रियंका गांधींचं टीकास्त्र, व्हिडीओ केला शेअर
4
आमचं ‘जीना यहां, मरना यहां’, पण हर्षवर्धन पाटलांंचं तसं नाही, चंद्रकांत पाटील यांची खोचक टीका
5
PM नरेंद्र मोदींची घटनात्मक पदावर २३ वर्षे पूर्ण, २००१ मध्ये पहिल्यांदा मुख्यमंत्री बनले!
6
अकोल्यात किरकोळ कारणांवरून दोन गटात वाद, हरिहर पेठ येथे दगडफेक, तणावपूर्व परिस्थिती
7
₹15 चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांची झुंबड...! लागलं 20% चं अप्पर सर्किट, जबरदस्त आहे कारण
8
 उद्धव ठाकरेंची कार्यशैली म्हणजे ‘आपला तो बाब्या, दुसऱ्याचं ते कारटं’, श्रीकांत शिंदेंची टीका
9
"महत्वाच्या टप्प्यावर पोहोचले युद्ध!", इकडे झेलेंस्कींनी घोषणा केली; तिकडे युक्रेननं रशियाचा तेल डेपो उडवला!
10
इस्रायलवर दुहेरी वार! हिज्बुल्ला अन् हमासने एकत्रितपणे केला मिसाईल हल्ला; अनेक जण जखमी
11
मुंबई लुटतच नाहीत तर फुकटात द्यायचं काम होतंय; आदित्य ठाकरेंचा CM शिंदेंवर गंभीर आरोप
12
माओवाद्यांची पुरवठा साखळी तोडण्यात महाराष्ट्राला मोठे यश; मुख्यमंत्री शिंदेंचा दावा
13
धक्कादायक! हिमाचल प्रदेशमध्ये चीनने पाठवले ड्रोन, भारताच्या हद्दीत हेरगिरीचा प्रयत्न?    
14
रिओ ऑलिम्पिकचे पदक थोडक्यात हुकलेली जिम्नॅस्ट दीपा कर्माकरची ३१व्या वर्षी निवृत्तीची घोषणा
15
वैद्यकीय क्षेत्रातील 'नोबेल' जाहीर! अमेरिकन शास्त्रज्ञ व्हिक्टर अम्ब्रोस, गॅरी रुवकुन यांची निवड
16
"...म्हणून पांडुरंगाने ते (घड्याळ) काढून घेतलं"; इंदापुरात सुप्रिया सुळेंनी काय सांगितलं?
17
पाक शान-शफिकची जोडी जमली; पण सचिन-सेहवागच्या रेकॉर्ड पर्यंत नाही पोहचली
18
हर्षवर्धन पाटील यांचा पक्षप्रवेश होताच प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले, "इंदापूरचे हे महाधनुष्य..."
19
'सुट्टी'वरून राडा! शिक्षिकेची सहकारी शिक्षकाला मारहाण; व्हिडीओ व्हायरल
20
900% पर्यंत खटा-खट परतावा देणारे शेअर धडा-धड आपटले! 6 महिन्यात नाव बुडाली, लोकांवर डोक्याला हात लावायची वेळ आली

Pune Bopdev Ghat News: 'त्या' नराधमांची माहिती देणाऱ्यास दहा लाखांचे बक्षीस जाहीर; बोपदेव घाट संतापजनक प्रकरण

By ऑनलाइन लोकमत | Published: October 07, 2024 2:46 PM

आतापर्यंत २०० हुन अधिक सराईतांची चौकशी झाली असून बोपदेव घाटापासून ७० ते ८० किलोमीटर अंतरापर्यंत शंभर ठिकाणचे सीसीटीव्ही तपासणार

पुणे : बोपदेव घाटात तरुणीवर झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणानंतर राज्यभरातून संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकरणात पोलिसांनी संशयित आरोपींच्या वर्णनावरून त्यांचे स्केच तयार केले आहे. तसेच सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीनेदेखील पोलिस तपास करत आहेत. तसेच आरोपींचा शोध घेण्यासाठी तीन हजार मोबाइल वापरकर्त्यांची माहिती पोलिसांकडून संकलित करण्यात येत आहे. त्याआधारे पोलिसांकडून तांत्रिक विश्लेषण सुरू करण्यात आले आहे. पोलिसांकडून दोनशेहून अधिक सराईतांची चौकशी करण्यात येणार आहे. आरोपीची माहिती देणाऱ्यास दहा लाख रुपयांचे बक्षीसही जाहीर करण्यात आले आहे. पोलिसांकडून एआय (आर्टिफिशिअल इंटेलिजन्स) तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे.

बोपदेव घाट हा परिसर निर्जन आहे. या भागात सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत, तसेच तांत्रिक अडचणींमुळे मोबाइल विश्लेषण करण्यात अडथळे आले आहेत. आरोपी बोपदेव घाटातून सासवडकडे गेल्याचा संशय आहे. बोपदेव घाटापासून ७० ते ८० किलोमीटर अंतरापर्यंत शंभर ठिकाणचे सीसीटीव्ही चित्रीकरण संकलित करण्यात येणार आहे.

गेल्या १५ दिवसांत बोपदेव घाट मार्गे गेलेल्या तीन हजार मोबाइल वापरकर्त्यांची माहिती पोलिसांकडून संकलित करण्यात येत आहे. त्याआधारे पोलिसांकडून तांत्रिक विश्लेषण सुरू करण्यात आले आहे. बोपदेव घाटापासून ७० ते ८० किलोमीटरपर्यंत सीसीटीव्ही चित्रीकरण संकलित करण्यात येणार आहे. दोनशेहून अधिक सराईतांची चौकशी सुरू करण्यात आली आहे, अशी माहिती परिमंडळ ५ चे पोलिस उपायुक्त आर. राजा यांनी दिली.

पुण्यातील सर्व टेकड्यांवर लाईट अन् सायरन बसवणार

बोपदेव घाटात तरुणीवर तिघांनी केलेल्या सामूहिक अत्याचारानंतर आता शहरातील सर्व टेकड्यांवर सर्च लाईट बसवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच सर्व टेकड्यांवर सायरन बसवले जाणार आहे. टेकड्यांवर होणाऱ्या चोऱ्या, लूट थांबवण्यासाठी पुण्यातील सर्व टेकड्यांवर सर्च लाईट बसवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जेथे वीजपुरवठा नाही, अशा टेकडीवर पोलिस मदत केंद्र उभारले जाईल. तेथे पोलिस वाहनांना सर्च लाईट देण्यात येईल. ती वाहने अशा टेकडीवर असतील. महापालिकेला सांगून या टेकडीवर वीजपुरवठा करण्यात सांगण्यात येणार आहे. जेथे जेथे अशा घटना झाल्या, त्या टेकडीवर सर्च लाईट उभारले जातील अशी माहिती सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांनी दिली. 

टॅग्स :PuneपुणेWomenमहिलाPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीMONEYपैसाMolestationविनयभंग