शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
3
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
4
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
5
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
6
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
8
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
9
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
10
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
11
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
12
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
13
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
14
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
15
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
16
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
17
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
19
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"
20
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला

रविवार पेठेतील सराफी व्यावसायिकाचे दुकान लुटले; तब्बल साडेतीन कोटींची चोरी

By नम्रता फडणीस | Published: January 02, 2024 6:22 PM

कामगारांपैकीच कुणीतरी दुकान व तिजोरीची बनावट चावी बनवून तिजोरीत ठेवलेली रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने चोरले

पुणे : रविवार पेठेत सराफी व्यावसायिकाचे दुकान लुटल्याचा प्रकार समोर आला आहे. सध्या कामावर असलेल्या किंवा पूर्वी कामावर असलेल्या कामगारांपैकीच कुणीतरी दुकान व तिजोरीची बनावट चावी बनवून तिजोरीतठेवलेली रोख रक्कम व सोन्याचे दागिने असा मिळून ३ कोटी ३२ लाख ९ हजार २२८ रुपये किंमतीचा ऐवज चोरून नेल्याने फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सराफी व्यावसायिक दीपक माने यांनी फिर्याद दिली आहे. ३१ डिसेंबर रोजी रात्री ८ ते १ जानेवारी सकाळी १० वाजण्याच्या दरम्यान  ही घटना घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे रविवार पेठेत राज कास्टिंग नावाचे दुकान आहे. हे दुकान कुलूप लावून बंद होते. मात्र त्याच दुकानामध्ये सध्या कामासाठी असलेले किंवा यापूर्वी काम करीत असलेल्या कामगारांपैकी कुणीतरी कामगाराने फिर्यादी यांच्या दुकानाची व तिजोरीची बनावट चावी बनवून त्या चावीने दुकानाचा दरवाजा उघडत त्याद्वारे आत प्रवेश केला. दुकानामधील लोखंडी तिजोरी बनावट चावीने उघडून त्यात ठेवलेले १० लाख ९३ हजार २६० रुपये रोख रक्कम व सोन्याचे दागिने असा एकूण ३ कोटी ३२ लाख ९हजार २२८ रुपयांचा ऐवज चोरला आहे. याप्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक वैभव गायकवाड करीत आहेत.

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसGoldसोनंSilverचांदीjewelleryदागिनेThiefचोर