शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मविआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

Pune Crime : अत्याचारासह सततच्या त्रासाला कंटाळून शाळकरी मुलाने उचलले टोकाचे पाऊल  

By नम्रता फडणीस | Published: November 26, 2024 3:56 PM

याप्रकरणी सहकारनगर पोलिसांनी एका तरुणाला अटक केली.

पुणे : लैंगिक अत्याचारासह सततच्या त्रासाला कंटाळून एका ५ वर्षीय शाळकरी मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. याप्रकरणी सहकारनगर पोलिसांनी एका तरुणाला अटक केली. त्याच्याविरुद्ध बालकांचे लैंगिक अत्याचारांपासून संरक्षण कायद्यान्वये (पोक्सो), तसेच आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.संकेत राजेश माेहिले (वय २६, रा. धम्मपाल संघाजवळ, ३१८ भवानी पेठ आणि मोहननगर, धनकवडी) असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत मुलाच्या वडिलांनी सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पीडित मुलगा आणि आरोपी संकेत मोहिले यांची ओळख होती. मुलगा दहावीत शिकत आहे. मोहिलेने मुलाला आमिष दाखवून वर्षभरापूर्वी तळजाई टेकडी परिसरात नेले. तेथे त्याने मुलाबरोबर अश्लील कृत्य, तसेच अनैसर्गिक अत्याचार केले. मोहिले याने मोबाइलवर छायाचित्रे काढली. त्यानंतर त्याने मुलाला धमकावण्यास सुरुवात केली. तो मुलाला सतत फोन करुन त्रास देत असे.

या त्रासामुळे मुलाने १५ नोव्हेंबर रोजी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यानंतर मुलाच्या वडिलांनी पोलिसांकडे तक्रार दिली. चौकशीत मोहिलेने मुलावर अत्याचार करुन त्याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचे उघड झाले. त्यानंतर याप्रकरणी मोहिलेला अटक करण्यात आली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक छगन कापसे यांनी घटनास्थळी भेट दिली असून, सहायक पोलीस निरीक्षक पवार तपास करत आहेत.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस