पुणे : पुण्यातील एन आय बी एम रस्त्यावर काल पहाटे भीषण अपघात घडला आहे. अपघातात दूध विक्रेत्याच्या दुचाकीचे सुद्धा मोठे नुकसान, झाले असून घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे. याप्रकरणी कोंढवा पोलिस ठाण्यात याप्रकरणी चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना पुण्यातील कोंढवा परिसरात असलेल्या एन आय बी एम रोड वर पहाटे ४ वाजता घडली. एका भरधाव चार चाकी चालकाचे गाडीवरचे नियंत्रण सुटले आणि त्याने गाडी थेट त्या ठिकाणाहून जात असलेल्या दूध विक्रेत्याच्या गाडीवर घातली. या अपघातात दूध विक्रेत्याच्या गाडीचे मोठे नुकसान झाले तसेच मोठ्याप्रमाणावर दूध पण रस्त्यावर सांडले. अपघातात झाल्यानंतर चार चाकी चालकाला थांबवण्याचा प्रयत्न स्थानिकांकडून करण्यात आला मात्र त्याने तिथून पळ काढला. याप्रकरणी आता संबंधित चालकावर कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. चालकाने मद्य प्राशन केले होते का याचा देखील तपास पोलिसांकडून सुरू आहे.