पुणे : युट्युब चॅनेल सबस्क्राईब करा आणि चांगला परतावा मिळवा असे सांगून महिलेची फसवणूक केल्याची घटना घडली आहे. याबाबत उंड्री परिसरात राहणाऱ्या एका ३१ वर्षीय महिलेने गुरुवारी (दि. १२) फिर्याद दिली आहे.
सदरचा गुन्हा २५ जून २०२३ ते ३० जून २०२३ यादरम्यान ऑनलाइन स्वरूपात घडला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार टेलिग्रामच्या माध्यमातून पुण्यातील उंड्री परिसरात राहणाऱ्या एकाला अज्ञात व्यक्तीने संपर्क साधला. त्यानंतर युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करून पैसे कमवता येईल असे सांगत वेगवेगळे टास्क देऊन तब्बल १३ लाख ९० हजार रुपये गुंतवण्यास भाग पाडण्यात आले. मात्र, कोणत्याही प्रकारचा परतावा न देता सदर रकमेची फसवणूक करत ऑनलाइन गंडा घालण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी उंड्री परिसरात राहणाऱ्या महिलेने यांनी अज्ञात मोबाईल क्रमांक धारक तसेच टेलिग्राम युजर आणि विविध बँक खातेधारक यांच्या विरोधात कोंढवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक तोरगल पुढील तपास करत आहे.