आळंदी : आळंदी येथील इंद्रायणी नदीकाठी भागेश्वरी धर्मशाळा ट्रस्टच्या मोकळ्या जागेत एका अज्ञात महिलेच्या डोक्यात दगड घालून खून करण्यात आल्याची घटना उघड झाली आहे. खून झालेल्या झालेल्या महिलेची अद्याप ओळख पटलेली नाही. याप्रकरणी पोलीस अंमलदार ज्ञानेश्वर घुले यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आळंदी मधील इंद्रायणी नदीकाठी भागेश्वरी धर्मशाळा ट्रस्टच्या मोकळ्या जागेत एका अज्ञात महिलेचा मृतदेह शनिवारी (दि.२०) आढळला. घटनेची माहिती मिळताच दिघी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेतला. महिलेच्या डोक्यावर गंभीर जखमा आढळून आल्या असून अज्ञात व्यक्तीने डोक्यात दगड घालून तिचा खून केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून वर्तवला जात आहे. याबाबत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून दिघी पोलीस पुढील तपास करत आहेत.