पुणे :मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर थांबलेल्या ट्रकवर आदळून कारचालक तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. याप्रकरणी ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
गणेश चंद्रकांत थोपटे (२२ रा. खामगाव, रांजणे, ता. हवेली) असे मृत्युमुखी पडलेल्या चालक तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चंद्रकांत थोपटे यांनी याबाबत भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. गुरुवारी (दि. ३०) रात्री साडेअकराच्या सुमारास कार चालक गणेश बाह्यवळण मार्गावरून नवले पुलाकडे निघाला होता.
कात्रज नवीन बोगद्याजवळ ट्रक रस्त्याच्या कडेला थांबला होता. त्यावेळी कारचालक गणेशला रस्त्यात थांबलेला ट्रक दिसला नाही. ट्रकवर पाठीमागून आदळून गणेश गंभीर जखमी झाला. उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक मोहन देशमुख करत आहेत.