पुणे : पुणे शहरात कर्वेनगर परिसर व उपनगरामध्ये अल्पवयीन मुलांकडून बेफाम पद्धतीने गाड्या चालवल्या जातात. हा बेफामपणा महिलेच्या जीवावर भेतला असून तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला असून पोलिसांकडून युवकावर कारवाई करण्यात आली. हिंगणे होम कॉलनी मध्ये बेफाम पणे वाहन चालविणाऱ्या व सायलेन्सर व कर्णकर्कश हॉर्न मधून आवाज काढणाऱ्यावर कारवाई करावी अशी मागणी रहवाशी करत आहेत.
काही दिवसांपूर्वीच श्रीकृष्ण मित्र मंडळाच्या बरोबर समोर श्रीकृष्ण मित्र मंडळाचे सामाजिक कार्यकर्ते माननीय समीर वसवे यांच्या मातोश्री रंजना प्रकाश वसवे यांचे नुकतंच एका बेफाम टू व्हीलर वाल्यांनी उडवल्यामुळे दुखद निधन झाले. कर्वेनगर परिसरात रंजना या रस्ता ओलांडत असताना समोर भरधाव वेगात येणाऱ्या एका दुचाकी चालकाने त्यांना उडवले. या अपघातात गंभीर जखमी झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे
कर्वेनगर येथील हिंगणे होम कॉलनीत सध्या अनेक तरुण बेफाम पणे गाड्या चालवत आहेत, जोरजोरात कर्कश हॉर्न वाजवत आहेत, बुलेटच्या सायलेन्सर मधनं फटाकडे वाजवत आहेत, गाड्या रेस करत आहेत ,या सगळ्याचा परिसरातील नागरिकांना भयंकर त्रास होत आहे , याच्यावर उपाययोजना करणे फार गरजेचे आहे, अशा बेफाम आणि उन्नम्त झालेल्या वाहन चालकांवर त्वरित कारवाई करणे फार गरजेचे आहे.