मी आबांची लेक... ते नक्की माघार घेतील : अश्विनी कदम 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2019 01:44 PM2019-10-04T13:44:35+5:302019-10-04T13:45:23+5:30

'ते' मला पित्यासमान असून काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते त्यांची समजूत काढण्यात यशस्वी होतील....

... aaba bagul will definitely retreat from parvati constituency : Ashwini Kadam | मी आबांची लेक... ते नक्की माघार घेतील : अश्विनी कदम 

मी आबांची लेक... ते नक्की माघार घेतील : अश्विनी कदम 

googlenewsNext
ठळक मुद्देभारतीय जनता पक्षाच्या जातीयवादी राजकारणाविरुद्ध माझा लढा : आबा बागुल

पुणे : पर्वती मतदार संघाच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार अश्विनी कदम यांनी शक्ती प्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी रॅलीला सुरुवात केली. यावेळी कदम म्हणाल्या, मला मतदार संघाचा अनुभव असून मी स्थानिक आहे. त्यामुळे मला स्थानिक जनतेचे प्रश्न माहिती आहेत. मतदार संघात विकास कामे झालेली नाहीत. अनेक अडचणींचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. काँग्रेसचे नाराज नगरसेवक आबा बागुल यांची मी लेकच आहे. ते मला पित्यासमान असून काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते त्यांची समजूत काढण्यात यशस्वी होतील. आबा नक्की माघार घेतील असेही कदम यावेळी म्हणाल्या.
यासंदर्भात बोलताना अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करायला जात असलेले आबा बागुल म्हणाले, अश्विनी कदम निश्चितच मला मुलीसारख्या आहेत. त्यांनीही वडिलांची मानसिकता समजून घ्यावी. कदम यांच्यावर जेव्हा 2012 साली अन्याय झाला तेव्हा त्या सुद्धा अपक्ष लढल्या होत्या. मी कदम, राष्ट्रवादी वा काँग्रेस यांच्याविरुद्ध लढत नसून दहा वर्षे काहीही काम न करणाऱ्या विद्यमान भाजपा आमदाराशी लढणार आहे. भारतीय जनता पक्षाच्या जातीयवादी राजकारणाविरुद्ध माझा लढा आहे. विकासकामांच्या जोरावरच मी अपक्ष लढणारच आहे. उमेदवारी मागे घेण्याबाबत मला कोणत्याही वरिष्ठ नेत्याने संपर्क साधलेला नाही.

======
राष्ट्रवादीच्या उमेदवार अश्विनी कदम या रॅलीने उमेदवारी अर्ज दाखल करायला निवडणूक आयोगाच्या कार्यालयात आल्या असता त्याच वेळी काँग्रेसचे बंडखोर उमेदवार आबा बागुल सुद्धा अर्ज दाखल करण्यासाठी आले होते. बागुल अर्ज दाखल करून येत असताना कार्यालयाच्या आवारात अश्विनी कदम आणि ते एकमेकांसमोर आले. त्यावेळी कदम यांच्यासोबत काँग्रेसचे आमदार अनंत गाडगीळ, प्रदेश सरचिटणीस ?ड. अभय छाजेड, राष्ट्रवादीचे प्रवक्ते अंकुश काकडे, माजी आमदार कमल ढोले पाटील, एड. जयदेव गायकवाड उपस्थित होते. बागुल यांना कंद यांनी 'हात' केला परंतु त्यांनी दुर्लक्ष केले. यावेळी बागुल यांनी ढोले पाटील यांना मिठी मारत आशीर्वाद घेतले; परंतु अन्य नेत्यांशी बोलणे टाळले. जाता जाता नेत्यांना 'आमचे बघा किती लांब गेले.' असा टोमणा मारला

Web Title: ... aaba bagul will definitely retreat from parvati constituency : Ashwini Kadam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.