बारामती : देशाला स्वातंत्र्य मिळवुन देण्यात आद्य क्रांतीगुरु वस्ताद लहुजी साळवे यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांनी अनेक महान देशभक्त तयार केले होते, असे प्रतिपादन सभापती संजय भोसले यांनी केले. या कार्यक्रमाचे आयोजन लहुजी शक्ती सेना बारामती तालुका अध्यक्ष दादा सकट यांच्या मार्गदर्शनाखाली पप्पु खरात, राहुल खरात, विशाल अडागळे, अमोल खरात, राहुल खरात यांनी केले. दरम्यान जय लहुजी वस्ताद गणेश तरुण मित्र मंडळाच्या वतिने साठेनगर चौकात सोमनाथ अडागळे यांच्या मार्गदर्शनाखाली अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी विविध पदाधिकाऱ्यांसह समाज बांधव उपस्थित होते.
साळवे यांच्या जयंतीनिमित्त लहुजी शक्ती सेनेने माळेगाव- बारामती अशी अभिवादन रॅली काढली होती. यावेळी सरपंच जयदीप तावरे, विद्यमान सदस्य जयदीप दिलीप तावरे, रविराज तावरे, राजाभाऊ खरात, राजेंद्र चव्हाण, आप्पा बनसोडे, विश्वास भोसले, प्रविण बनसोडे, योगराज राजेजाधवराव, अनिल लोणकर, दिलीप जाधव, डॉ. राजेंद्र सस्ते, संतोष जगताप आदी उपस्थित होते.माळेगाव येथे लहुजी शक्ती सेना, लहुजी दहिहंडी संघ व पप्पु खरात मित्र परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने आद्यक्रांतीगुरु वस्ताद लहुजी साळवे यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी सभापती भोसले यांच्या हस्ते वस्ताद लहुजी साळवे व इतर महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.यावेळी बोलताना सभापती भोसले म्हणाले की, वस्ताद लहुजी साळवे हे प्रखर देशभक्त होते. त्यांनी पुण्यात तालिम उभारुन अनेक क्रांतिकारकांना घडविले. त्यांचे विचार व देशभक्ती आज ही प्रेरणादायी आहे.