पुणे : संपूर्ण भारतात साजरा होणाऱ्या नवरात्र महोत्सवाची बुधवारी (१० आॅक्टोबर) घटस्थापनेपासून सुरु होत आहे. त्यासाठी शहरातील विविध देवीची मंदिरे सजली आहेत़. या नवरात्र महोत्सवासाठी पुण्यातील देवीच्या मंदिराची तयारी पूर्ण झाली आहे. पुण्याचे ग्रामदैवत तांबडी जोगेश्वरी मातेच्या मंदिराची साफसफाई करण्यात आली आहे. तसेच मंदिराच्या आवारात विद्युत रोषणाई, मांडव व रंगबेरंगी कापडाने सजावट केली आहे. घटस्थापनेला पहाटे पाच वाजता घट बसवण्यात येणार आहेत. त्यानंतर महापूजा झाल्यावर ६ वाजल्यापासून भाविकांना दर्शनासाठी सोडण्यात येईल. घटस्थापनेपासून तर दसऱ्यापर्यंत भाविकांना जोगेश्वरी मातेची नऊ रुपे पाहायला मिळणार आहेत. या नऊ रूपांमध्ये दुसऱ्या माळेला शेषासनी, तिसऱ्या माळेला व्याघरंबरी, चौथ्या माळेला वैष्णवी, पाचव्या माळेला अश्वाअरुडा, सहाव्या माळेला सरस्वती, सातव्या माळेला लक्ष्मी, आठव्या माळेला दुर्गा व दसऱ्याला अँग्री देवी अशा विविध रुपात देवीचे दर्शन घेता येणार आहे. दसऱ्याला १८आॅक्टोबर रोजी तांबडी जोगेश्वरी मातेची भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे.
आई उदे गं...अंबाबाई...! देवीच्या जागरासाठी शहरातील सजली मंदिरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2018 17:00 IST
संपूर्ण भारतात साजरा होणाऱ्या नवरात्र महोत्सवाची बुधवारी (१० आॅक्टोबर) घटस्थापनेपासून सुरु होत आहे. त्यासाठी शहरातील विविध देवीची मंदिरे सजली आहेत़.
आई उदे गं...अंबाबाई...! देवीच्या जागरासाठी शहरातील सजली मंदिरे
ठळक मुद्देमंदिराच्या आवारात विद्युत रोषणाई, मांडव व रंगबेरंगी कापडाने सजावट विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन घटस्थापनेपासून तर दसऱ्यापर्यंत भाविकांना जोगेश्वरी मातेची नऊ रुपे पाहायला मिळणार