पुणे : पुणे रेल्वे स्थानकाच्या परीसरात उबर टॅक्सीकडून स्पाॅट बुकिंग करण्यात येत असल्याचा अाराेप करत अाम अादमी रिक्षा चालक संघटनेच्यावतीने बुधवारी रेल्वे स्टेशनच्या प्रवेशद्वारावर चक्काजाम अांदाेलन करण्यात अाले. पाेलीसांनी अांदाेलनकर्त्यांना काहीकाळ ताब्यात घेऊन साेडून दिले. दरम्यान वाहतूक अायुक्त कार्यालयाकडून दाेन दिवसात कारवाईचे अाश्वासन दिल्यानंतर हे अांदाेलन मागे घेण्यात अाले. या अांदाेलनाविषयी बाेलताना या अाप रिक्षा चालक संघटनेचे सल्लागार श्रीकांत अार्चाय म्हणाले, अाेला टॅक्सिंच्या स्पाॅट बुकींगबाबात अाम अादमी रिक्षा चालक संघटनेच्या वतीने नाेव्हेंबरमध्ये अाक्षेप घेतला हाेता. हाच मुद्दा या संघटनेच्या वतीने फेब्रवारी 2018 मध्ये परिवहन मंत्री दिवाकर रावते तसेच पालकमंत्री गिरीश बापट यांच्यासमाेर सचिवालयाच्या बैठकीत मांडण्यात अाला हाेता. त्यावेळी त्यावेळचे वाहतूक अायुक्त प्रवीण गेडाम यांनी स्पाॅट बुकिंग बेकायदेशीर असल्याचे म्हंटले हाेते. त्यानंतरही पुणे अारटीअाेकडून कारवाई झाली नाही. अाता रेल्वे प्रशासनाने उबर कंपनीशी करार करुन त्यांना पार्किंगसाठी जागा उपलब्ध करुन दिली अाहे. त्याला अामचा अाक्षेप नाही, परंतु उबेर टॅक्सीकडून स्पाॅट बुकींग हाेत असून त्याला अामचा विराेध अाहे.त्यासाठी अांदाेलन करण्यात अाले. माेटार व्हेईकल अॅक्ट 1988 व रिक्षा व्यावसायिकांच्या संरक्षणासाठी अाम अादमी रिक्षा चालक संघटनेच्यावतीने हे चक्का जाम अांदाेलन करण्यात अाले. कायद्याचे संरक्षण सरकारी अधिकारी करत नसल्याने अाम्हाला संविधानाखाली एकत्र येत अांदाेलन करावे लागले. दाेन दिवसात कारवाईचे अाश्वासन वाहतूक अायुक्त कार्यालयाकडून देण्यात अाले अाहे. कारवाई न झाल्यास पुन्हा अाम्ही अांदाेलन करु. या अांदाेलनावेळी या संघटनेचे अध्यक्ष आसगर बेग, उप अध्यक्ष गणेश ढमाले ,सचिव सुभाष करांडे, खजिनदार बाबा सैयद, उप सचिव आनंद आंकुश, सल्लागार श्रीकांत आचार्य उपस्थित हाेते.
उबरच्या स्पाॅट बुकींग विराेधात अाप रिक्षा चालक संघटनेचा चक्काजाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2018 8:33 PM