शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मविआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

आर्त स्वर भिडले अंतरंगी..लागली समाधी आनंदांची 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2018 10:29 PM

लोकमत सखी मंचच्या राष्ट्रीय अध्यक्षा तथा संस्थापक-अध्यक्ष आणि संगीताच्या निस्सीम साधक ज्योत्स्नाभाभी दर्डा यांच्या पाचव्या स्मृतिदिनानिमित्त ‘भजनसंध्या’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

ठळक मुद्देभारतीय अभिजात संगीत क्षेत्रात ग्वाल्हेर घराण्याच्या युवा गायिका मंजुषा कुलकर्णी-पाटील यांचे नाव ख्याल गायकीसाठी प्रसिद्ध

पुणे : श्रद्धा,साधना आणि भक्तिरसाला लाभलेली स्वरांची श्रवणीय साथ..हे सुरांचे देणे म्हणजे जणू ईश्वरी अनुभूतीच. या हदयाला भिडलेल्या अभिजात स्वरांनी रसिकांना समाधीवस्थेत नेले. उपस्थितांना एका स्वर्गीय आनंदाची साक्षानुभूती दिली. प्रसिद्ध युवा गायिका मंजुषा कुलकर्णी-पाटील यांच्या भारदस्त स्वरांनी अवघा आसमंत भक्तिरसात न्हाऊन गेला. या अविस्मरणीय सोहळ््याला निमित्त होते...लोकमत सखी मंचच्या राष्ट्रीय अध्यक्षा तथा संस्थापक-अध्यक्ष आणि संगीताच्या निस्सीम साधक ज्योत्स्नाभाभी दर्डा यांच्या पाचव्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित ‘भजनसंध्या’  या कार्यक्रमाचे. या कार्यक्रमाचे उद्घाटन ज्योत्स्ना दर्डा यांच्या भगिनी सुशीलाभाभी बंब,सखी मंचाच्या माजी समन्वयक विमल दर्डा, अरूणा गटागट, संजीवनी उन्हाळे, सुनंदा दीक्षित आणि गायिका मंजुषा पाटील यांच्या उपस्थितीत दीप्रज्वलनाने झाले.भारतीय अभिजात संगीत क्षेत्रात ग्वाल्हेर घराण्याच्या युवा गायिका मंजुषा कुलकर्णी-पाटील यांचे नाव ख्याल गायकीसाठी प्रसिद्ध आहे. स्वरांमधील त्यांची  स्पष्टता, भारदस्तपणा, अभिजात कंठ गायकी या त्यांच्या गानवैशिष्ट्यांमुळे त्यांच्या मैफिलीमधून रसिकांना श्रवणानंदाचा प्रत्यय आल्याशिवाय राहत नाही. काल पुनश्च: त्याचीच प्रचिती आली. व्यासपीठावर या युवा गायिकेचे आगमन होताच रसिकांनी टाळ्यांचा कडकडाट केला. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र,जिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र या रचनेने कार्यक्रमाची नांदी करत मंजुषा कुलकर्णी यांनी भक्तिमय वातावरणाची निर्मिती केली. जय जय रामकृष्ण हरीचे स्वर आसमंतात निनादू लागले आणि रसिकांना ब्रम्हानंदी टाळी लागली.त्यानंतर रूप पाहाता लोचनी अवघे पंढरपूर, पालखीच्या संगे मन माझे धावे अबीर गुलाल उधळीत रंग आणि देवा पांडुरंगा अशा भक्तिरचनांनी कळसाध्याय गाठला आणि त्या स्वरांमध्ये रसिक एकरूप झाले. जोहार मायबाप या भक्तिरचनेने रसिकांना जिंकले. या कार्यक्रमात  मंजूषा कुलकर्णी-पाटील यांना राहुल गोळे (हार्मोनिअम), रोहित मुजूमदार (तबलावादक), प्रसाद भांडवलकर (टाळ) यांनी साथसंगत केली.----------------------------------------------------------

ज्योत्स्नाचे व्यक्तिमत्व अत्यंत प्रेमळ आणि उत्साही होते. संगीताची तिला विशेष आवड होती. तिने संगीताच्या परीक्षाही दिल्या होत्या. घराचाउंबरठा न ओलांडलेल्या सखींना तिने मुक्त अवकाश मिळवून दिले. आयुष्यातून व्यक्ती निघून जातात. पण आपल्या बहुमूल्य कायार्तून त्या कायम स्मरणात राहतात- सुशीलाभाभी बंब, भगिनी----------------------------------------------------------

टॅग्स :Puneपुणेentertainmentकरमणूक