शहरं
Join us  
Trending Stories
1
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
2
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
3
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
4
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
6
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
7
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
8
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
9
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
10
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
11
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
12
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
13
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
14
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
15
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
16
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
18
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "मी शरद पवारांना सोडलं नाही, सगळ्या आमदारांना..." अजित पवारांचं बारामतीत मोठं विधान
20
'सत्य बाहेर येत आहे...', PM नरेंद्र मोदींनी केले 'द साबरमती रिपोर्ट' चित्रपटाचे कौतुक

दुर्बलांसाठी ‘आयुष्यमान ’ ठरतेय नवसंजीवनी : एकनाथ शिंदे 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 09, 2019 3:14 PM

आयुष्यमान भारत ही जगातील सर्वांत मोठी आरोग्य सेवा योजना असून याचा लाभ  १० कोटी ७४ लाख कुटुंबातील ५५ कोटी लोकांना होणार आहे.

ठळक मुद्देदेशात आतापर्यंत साडे चौदा लाख लोकांना लाभ

 पुणे : आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील रुग्णांना विविध आजारांवर उपचार घेणे शक्य होत नाही. त्यांच्यासाठी आयुष्यमान भारत योजना व महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना नवसंजीवनी ठरत आहे, असे मत राज्याचे आरोग्य मंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले. सुर्या सह्याद्री रुग्णालय दोन्ही योजनांसाठी समर्पित करण्यात आले आहे. अशी सुविधा देणारे हे भारतातील पहिले रुग्णालय ठरले आहे. केंद्रीय आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्री जे.पी.ड्डा यांनी या उपक्रमाचे शुक्रवारी व्हिडिओ कॉन्फरिन्सिंगद्वारे लोकार्पण केले. पुण्यात झालेल्या कार्यक्रमावेळी शिंदे यांच्यासह सह्याद्री हॉस्पिटल्सचे अध्यक्ष डॉ.चारूदत्त आपटे,कार्यकारी संचालिका डॉ.जयश्री आपटे, एमपीजेएवाय चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.सुधाकर शिंदे, नॅशनल इन्श्युरन्स कंपनीचे सीआरएम रवी अय्यर आदी उपस्थित होते. यावेळी सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली. नड्डा यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थितांशी संवाद साधला. आयुष्यमान भारत ही जगातील सर्वांत मोठी आरोग्य सेवा योजना असून याचा लाभ  १० कोटी ७४ लाख कुटुंबातील ५५ कोटी लोकांना होणार आहे. देशात आतापर्यंत साडे चौदा लाख लोकांना लाभ मिळाला आहे. सुर्या सह्याद्री रुग्णालयाचे हे पाऊल कौतुकास्पद आहे, असे नड्डा म्हणाले. रुग्णालयामध्ये कार्डिओलॉजी, कार्डियाक सर्जरी, न्युरो सर्जरी, कॅन्सर केअर यांसारख्या सुपर स्पेशालिटीज गरजू रूग्णांना उपलब्ध आहेत. ७१ खाटांच्या या रुग्णालयामध्ये सर्व अद्यायावत व अत्याधुनिक सुविधा आहेत. हॉस्पिटलला एनएबीएच प्रमाणपत्र मिळाले असून एमपीजेएवाय क्वालिटी सेल चे गुणवत्तेसाठी उच्च दर्जाचे मानांकन मिळाले आहे, अशी माहिती डॉ. आपटे यांनी दिली.----------

टॅग्स :Puneपुणेayushman bharatआयुष्मान भारतEknath Shindeएकनाथ शिंदेMaharashtraमहाराष्ट्रIndiaभारत