बारामती: स्पॉट प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ईबीसी, शिष्यवृत्ती निवासी भत्ता, तसेच इतर शासनाच्या सवलती पुन्हा चालू करण्यात याव्यात व शेतकऱ्यांना वीजबिल भरणा सवलत देणे, कोरोनासारख्या भयंकर महामारीमुळे शेतकरी व मजूरवर्ग यांचे प्रचंड नुकसान झाले आहे, त्यामुळे कृषी पदवीधर संघटनेकडून ईबीसीसाठी व वीजबिल सवलतीसाठी बारामती तलाठी कार्यालयाला निवेदन देण्यात आले आहे.
कृषी पदवीधर संघटना बारामती तालुका, जिल्हा पुणे यांच्या वतीने कृषि पदवीतील स्पॉट प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ईबीसी, शिष्यवृत्ती निवासी भत्ता तसेच इतर शासनाच्या सवलतीचा लाभ घेता येत नसल्यामुळे सर्व विद्यार्थ्यांमध्ये सध्या निराशेचे वातावरण आहे. सध्या कोरोनासारख्या जागतिक महामारीमुळे सर्वांची आर्थिक परिस्थिती हलाकीची असून विद्यार्थी कसे बसे शिक्षण घेत आहेत. यातच शासनाने स्पॉट प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना भेटणाऱ्या शासनाच्या सवलती बंद केल्यामुळे विद्यार्थ्यांचे मानसिक खच्चीकरण होत आहे. जर हे असेच चालू राहिले तर हजारो विद्यार्थी शिक्षणापासून सवलती पासून वंचित राहतील. आशा होती की नुकत्याच पार पडलेल्या अधिवेशनात सादर केलेल्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना दिलासा मिळेल, परंतूु शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करून सरकारने अन्याय केला आहे. शेतकऱ्यांची वीजतोड जोमात सुरू केली आहे. तरी ही वीजतोड मोहीम तत्काळ बंद करून वीजजोडणी करावी, यासंदर्भात बारामती तालुका युवती सहसचिव मयूरी सातव यांनी बारामती तलाठी कार्यालयाला यांना निवेदन दिले आहे.
—————————————
फोटो ओळी : कृषी पदवीधर संघटनेकडून ईबीसीसाठी व वीजबिल सवलतीसाठी बारामती तलाठी कार्यालयाला निवेदन देताना बारामती तालुका युवती सहसचिव मयूरी सातव.
०३०४२०२१-बारामती-०३
—————————————