पोलीसांच्या भीतीने केली सुटका,बारामती तालुक्यातील घटना
बारामती:
व्याजाने घेतलेल्या १५ लाख रुपयांच्या मोबदल्यात ३० लाखांची मागणी करीत पाहुणेवाडी(ता.बारामती)येथील युवकाचे अपहरण केल्याची घटना २८ नोव्हेंबर रोजी घडली. मात्र, अपहरण झालेल्या युवकाला पोलीसांच्या भीतीने मोरगाव नजिक अपहरणकर्त्यांनी दुसऱ्या दिवशी सोडुन दिले आहे. अपहरण झालेला युवक सुखरुप असुन त्याला कोणतीही दुखापत झालेली नाही
बारामती तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक महेश ढवाण यांनी याबाबत माहिती दिली. अनमोल लालासाहेब परकाळे (वय २७, रा. पाहुणेवाडी, ता. बारामती) असे अपहरण झालेल्या युवकाचे नाव आहे. शनिवारी (ता. २८) रात्री या अपहरण नाट्यास रात्री सव्वा नऊच्या सुमारास प्रारंभ झाला. कुत्रे बाहेर फिरविण्यासाठी अनमोल घराबाहेर गेला होता. यावेळी काही मिनिटात त्याचे वडील लालासाहेब दौलतराव परकाळे यांना त्यांच्या मुलाच्याच फोनवरुन फोन आला. तुमच्या मुलाने माझ्याकडून १५ लाख रुपये घेतले आहेत, त्याचे व्याजासह तीस लाख रुपये उद्या दुपारी तीन वाजेपर्यंत मी सांगेन तेथे आणून द्या. पोलिसांना सांगितल तर मुलाला विसरा, असा दमच संबंधित अपहरण कर्त्यांनी लालासाहेब यांना भरला.
त्यानंतर रात्री १०.१२ नंतर पुन्हा १०.१६ वाचे दरम्यान लालासाहेब यांना परत त्याचा फोन आला. त्यावेळी तो मला म्हणाला की, तुमचा फोन व्यस्त लागतोय तुम्ही कोणाशी चर्चा केली काय, तुम्ही पोलीसांना फोन लावता काय जर तुम्ही पोलीसांना फोन केला तर तमच्या मुलाला विसरा, असा दम दिला. त्यावेळी लालासाहेब यांच्या पत्नी अनिता यांनी फोन घेवून मुलाकडे कसले पैसे आहेत, अशी विचारणा केली.त्यावर आमचा व्याजाचा व्यवसाय आहे. तुमच्या मुलाने माझ्याकडुन पंधरा लाख रुपये व्याजाने घेतले असुन त्याचे व्याज म्हणून तीस लाख रुपये उद्या दुपारी ३ वाचे पर्यंत द्यायचे, असे म्हणुन फोन बंद केला. मुलाचे बरे वाईट होईल या भीतीने परकाळे दांपत्याने मुलाच्या अपहरणाची तक्रार पोलिसात केलीच नाही.
रविवारी दुपारी दोन वाजता अनमोल याच्याच फोनवरुन पैशांची सोय झाली का असा विचारणा करणारा फोन आला. लालासाहेब यांनी आपल्याकडे आता दोन लाख रुपये आहेत, असे त्याला सांगितल्यावर पूर्ण पैशांची सोय करा नाहीतर मुलाला विसरा, असा दम पुन्हा देण्यात आाला. तासाभराने पुन्हा अपहरणकर्त्यांनी सहा लाख रुपये रोख व दोन कोरे चेक द्यावे लागतील, असे सांगितले. संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास मोरगाव रस्त्याने जेजुरीत पैसे घेऊन या, असा फोन आला. काऱ्हाटी येथे असताना पुन्हा अपहरणकर्त्यांनी मोरगाव येथे लालासाहेबांना बोलावले. पुन्हा त्यांना नीरा रस्त्याने नीरेकडे या असा निरोप फोनवर अपहरणकर्त्यांनी दिला. मात्र लालासाहेबांना अपहरणकर्त्यांनी विचारणा केली की तुमच्या गाड्यांच्या मागे पोलिसांच्या गाड्या आहेत काय,मात्र, पोलिसांचा व गाड्यांचा संबंध नाही असे सांगितल्यावर पुन्हा त्यांना मोरगावकडे येण्यास सांगितले. यावेळी पेट्रोलपंपावर थांबण्यास सांगितल्यावर पुन्हा नीरा बाजूकडे गाडी आणण्यास सांगितले गेले. गुळुंचे येथे असतानाच लालासाहेब यांना अनमोलचाच पोन आला की त्याला मोरगाव जेजुरी रस्त्यावरील श्रीसृष्टी धाब्यानजिक अपहरणकर्त्यांनी सोडले आहे.
यावेळी अनमोल याने वडीलांना एक वॅगन आर या पांढरे रंगाची कारमध्ये तोंडाला मास्क लावलेल्या अनोळखी पाचजणांनी जबरदस्तीने बसवुन अपहरण केल्याचे सांगितले. दमदाटी करुन जिवे मारण्याच्या उद्देशाने अपहरण केल्याचे सांगितले. करुन पैश्याची मागणी केली. माझी वरील अनोळखी पाच इसमांविरुध्द तक्रार आहे.
————————————————
...पाचही अपहरण कर्त्यांचा
शोध घेण्यास सुरवात
लालासाहेब यांनी पोलिसांना कळवले नव्हते.मात्र, या अपहरणनाट्याची माहिती समजल्याने पोलिसांनीही समांतर पाठलाग सुरु केला होता. अपहरणकर्त्यांनाही पोलिसांचा सुगावा लागल्याने त्यांनी अनमोलला रस्त्यात सोडून पळ काढला. उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर, पोलिस निरिक्षक महेश ढवाण यांच्यासह अनेक पोलिस कर्मचारी या आॅपरेशनमध्ये सहभागी होते. अनमोल सुखरुप परत आल्याने सर्वांनीच सुटकेचा नि:श्वास सोडला.पोलिसांनी या पाचही अपहरण कर्त्यांचा शोध घेण्यास सुरवात केली आहे.