नारायण राणे आणि शिवसेनेमधील वाद काही केल्या थांबताना दिसत नाही. दोन्हीकडून दररोज आरोप-प्रत्यारोप आणि टीकेची झोड उठवली जात आहे. यात आता महसूल आणि ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांचीही भर पडली आहे. नाव राणे आणि चर्चा मात्र चार आण्याची करतात असा हल्लाबोल अब्दुल सत्तार यांनी केला आहे. ते पुण्यात एका ग्राम पंचायतीच्या कार्यालयाचं उदघाटन करताना बोलत होते.
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना फक्त बोलण्यासाठी भाजपमध्ये घेतलंय. त्यांचं नाव जरी राणे असलं तरी ते चर्छा फक्त चार आण्याची करतात, असा टोला सत्तार यांनी राणेंना लगावला.
बाळासाहेबांनी नाऱ्याचा नारायण केलाबाळासाहेब ठाकरे यांनी नाऱ्यापासून त्यांना नारायण राणेंपर्यंत पोहोचवलं. त्याचं भान त्यांनी ठेवलं पाहिजे होतं. पण ते विसरलेले दिसततात. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कुठे आणि राणे कुठे? असंही अब्दुल सत्तार म्हणाले. राणेंना पक्षात घेऊन भाजपानं खूप मोठी चूक केली असल्याचंही ते म्हणाले.
भाजपासोबतच नातं खूप चांगलं होतं. पण राणेंच्या समावेशानं आता नात्यात खूप वितुष्ट निर्माण झालं आहे. भाजपा आमच्या सोबत होता तोवर ते आंब्याच्या झाडाखाली बसले होते. पण आता राणेंच्या समावेशामुळे ते बाभळीच्या झाडाखाली बसले आहेत, भाजपानं याचं आत्मचिंतन करावं, असं अब्दुल सत्तार म्हणाले.