पुणे : लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांचे आवडते फळ असलेल्या पेरूचा हंगाम बहरात आला असून श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डातील फळबाजारात रायपूर पेरूचा हंगाम सुरू झाला आहे़ कमी बिया व चवीला गोड असणाऱ्या रायपूर पेरूचे वजन तब्बल ६०० ग्रॅम इतके आहे. रविवारी मार्केट यार्डातील फळ बाजारात सुमारे 1 टन रायपूर पेरूची आवक झाली.
रायपूर पेरूची प्रामुख्याने बारामती, खटाव, सातारा या परिसरातून आवक झाली़ या पेरूचा उगम हा मध्य प्रदेशातील रायपूर येथील आहे, त्यामुळेच या पेरूला रायपूर पेरू असे नाव पडले आहे़ या पेरूची आवक मार्केट यार्डात गेल्या आठवड्यापासून सुरू झाली. खरेदीसाठी ग्राहक या पेरुस पसंती देत आहेत़ याबाबत पेरूचे व्यापारी संतोष ओसवाल यांनी सांगितले की, गेल्या सहा ते सात वर्षांपासून या पेरूची तुरळक प्रमाणात आवक होत होती, मात्र,पाच वर्षांपासून आवक वाढत चालली आहे़ कमी बिया असल्याने हा पेरू दातांना जास्त त्रास न होता खाता येतो़ या पेरूचे वैशिष्ट्य म्हणजे बाजारात विक्रीला येणाºया प्रत्येक पेरूला आकर्षक पॅकिंग आहे़ या पेरूस घाऊक बाजारात प्रतिकिलोस 40 ते 100 रुपये भाव मिळत असल्याचेही ओसवाल यांनी नमूद केले़
दरवर्षी 17 टन उत्पादनपाच वर्षांपूर्वी रायपूरवरून पेरूची रोपे आणली होती़दीड एकरामध्ये 1200 झाडांची बागआहे़ त्यास जवळपास तीन लाख रुपये खर्च आला़ दरवर्षी 16 ते 17 टन इतके उत्पादन मिळते प्रतिकिलोस40 ते 100 रुपये भाव मिळत आहे़ सरासरी प्रतिवर्षी 9 लाख रुपयांचे उत्पन्न मिळते़ एकंदरीतच शेतकऱ्यांसाठी रायपूर पेरू वरदान ठरत आहे़- नितीन गायकवाड,शेतकरी, खटाव