एमआयटीने विद्यार्थ्यांकडून ‘आंतरराष्ट्रीय अभ्यास दौरा’ (इंटरनॅशनल स्टडी टूर) करण्यासाठी लाखो रुपये घेतले. कोरोनामुळे अभ्यास दौरा रद्द करण्यात आला. परंतु, दौऱ्यासाठी आकारण्यात आलेले शुल्क परत न केल्याने अभाविपने ‘विमान उडाव आंदोलन’ केले. शैक्षणिक वर्ष २०१९-२०२० मध्ये कोरोनाच्या संसर्गामुळे आंतरराष्ट्रीय अभ्यास दौरा झाला नाही. तसेच एमआयटीने शुल्क परत करण्याची घोषणा केली असली तरी अद्याप प्रत्यक्षात विद्यार्थ्यांच्या हातात शुल्क पडले नाही.
कोरोनाकाळात विद्यार्थ्यांना त्यांचे महाविद्यालयील शुल्क भरणे अवघड जात आहे. त्यात या दौऱ्याच्या नावाखाली विद्यार्थ्यांकडून लाखो रुपये वसूल केले जात असल्याचा निषेध यापूर्वी विविध संघटनांनी केला आहे.या आंदोलनात सहभागी झालेल्या अभाविपचे प्रदेश सह मंत्री अनिल ठोंबरे, पुणे महानगर मंत्री शुभम भुतकर यांच्यासह सुमारे १० कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन सोडून दिले.
चौकट
एमआईटीच्या बीटेक अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना २० दिवसांपूर्वी तीन पर्याय दिले आहेत. तसेच याबाबत पालक व विद्यार्थ्यांशी चर्चा केली आहे. मात्र, अभाविपचे कार्यकर्ते ‘एमआयटी’ला नाहक बदनाम करत आहेत.
- डॉ. प्रसाद खांडेकर, अधिष्ठाता, अभियांत्रिकी विभाग, एमआयटी विद्यापीठ