लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : क्यु बार अँड कॉर्नर शॉट स्नुकर करंडक अजिंक्यपद खुल्या स्नुकर स्पर्धेत पुण्याच्या अभिजीत रानडे, रोहन साकळकर आणि यश कोटे यांनी आपापल्या प्रतिस्पर्धांचा पराभव करून स्पर्धेच्या तिसऱ्या फेरीत प्रवेश केला.
स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीमध्ये पुण्याच्या अभिजीत रानडे याने सतचित जामगांवकर याचा सरळ फ्रेममध्ये पराभव करून स्पर्धेच्या तिसऱ्या फेरीमध्ये प्रवेश केला. यश कोटे याने आपली विजयी घौडदौड कायम ठेवत प्रणव दांगट याच्यावर संघर्षपूर्ण विजय मिळवून तिसरी फेरी गाठली.
रोहन साकळकर याने सम्राट सिंगचा संघर्षपूर्ण पराभव करून आगेकूच केली. सामन्यामध्ये सम्राट याने पहिली फ्रेम जिंकून आश्वासक सुरूवात केली. दुसर्या फ्रेममध्ये रोहनने मात करत सामन्यामध्ये बरोबरी केली. तिसऱ्या फ्रेममध्ये वर्चस्व मिळवत सम्राटने सामन्यात २-१ आघाडी घेतली. चौथी फ्रेम केवळ एका गुणाच्या आधारे जिंकत रोहनने सामन्यात २-२ अशी बरोबरी निर्माण केली. अखेरच्या आणि निर्णायक फ्रेममध्ये रोहनने विजय मिळवत सामना जिंकला. स्पर्धेच्या पहिल्या फेरीच्या सामन्यात प्रणव दांगट याने अॅरॉन एलिआस याचा पराभव केला. अभिषेक बोरा याने सिध्दांत फाटे याचा सहज पराभव करून विजयी सलामी दिली.
स्पर्धेचा सविस्तर निकाल : पहिली फेरी :
प्रणव दांगट वि.वि. अॅरॉन एलिआस ३-२ (०९-३७, १४-२२, ४७-२०, ३०-१५, ३५-३३),
अभिषेक बोरा वि.वि. सिध्दांत फाटे ३-० (३८-२७, ३९-१७, ४२-०६),
दुसरी फेरी : अभिजीत रानडे वि.वि. सतचित जामगांवकर ३-० (२९-२२, २०-१८, ४९-००),
रोहन साकळकर वि.वि. सम्राट सिंग ३-२ (३२-४१, ३५-१२, ०६-३६, ३०-२९, ३५-२०),
यश कोटे वि.वि. प्रवण दांगट ३-२ (५४-३३, २९-३२, २४-०२, ३४-४१, ३६-११),