कुरवली : येथील मास्टर अभिजित तात्यासाहेब सावंत यांनी मॉरिशस येथे झालेल्या १२ व्या राष्ट्रीय योगा स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविला.जगभरातील १४ देशांच्या स्पर्धकांचा यामध्ये सहभाग होता. यामध्ये इंटरनॅशनल स्पोटर््स कल्चरल अॅन्ड योगा फेडरेशनच्या वतीने भारताच्या टीमकडून महाराष्ट्रातील पाच योगाभ्यास विद्यार्थ्यांची निवड झाली होती. ८ ते २४ वर्षे वयोगटातील स्पर्धकांचा यामध्ये समावेश होता. अभिजितने वय वर्षे ८ ते १२ वर्षे गटामध्ये भारताचे प्रतिनिधित्व करीत प्रथम क्रमांक पटकावला आहे. अभिजित अण्णासाहेब डांगे पब्लिक स्कूल व ज्युनिअर कॉलेज (वाळवा जि. सांगली) येथील सैनिक शाळेत इ. ७ वीमध्ये शिक्षण घेत आहे. जांब (ता. इंदापूर) येथील योगाशिक्षक शंकर कवळे व शाळेतील क्रीडाशिक्षक सुशांत घोरपडे यांचे त्याला मार्गदर्शन मिळाले.
राष्ट्रीय योगा स्पर्धेत अभिजीत प्रथम
By admin | Published: April 26, 2016 1:42 AM