पुणे : लॉक डाऊनच्या काळात अत्यावश्यक कामांमध्ये लोकांना अडचण येऊ नये, म्हणून पोलिसांनीडिजिटल पासची सोय उपलब्ध करुन दिली होती. त्यात तब्बल ९१७ लोकांनी आधार कार्डाबाबत खोटी माहिती भरुन अर्ज केल्याचे आढळून आले. त्यांना दुरुस्ती करण्याची संधी देण्यात आली. आधार कार्डाबाबत खोटी माहिती भरणाऱ्या त्यातील ६ जणांविरुद्ध बंडगार्डन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.संचारबंदी व जमावबंदीच्या काळात लोकांना महत्वाच्या कामासाठी तसेच जीवनावश्यक वस्तुंचे वाहतूकीस अडचण येऊ नये, यासाठी पोलिसांनी क्युआर कोड वर आधारित लिंक उपलब्ध करुन दिली आहे. या लिंकवर ज्या व्यक्तीस अतिमहत्वाचे कामासाठी घराबाहेर जायचे आहे. त्यांनी त्याबाबत तपशील लिंकवर भरायचा आहे. ही माहिती भरल्यानंतर त्या व्यक्तीचे कारण संयुक्तिक असेल तर त्यांना त्याचे मोबाईलवर टेक्ट मेसेजद्वारे कळविले जाते. जर परवानगी दिली गेली असेल तर टेस्क मेसेजमध्ये एक लिंक पाठविली जाते व त्या लिंकवर क्लिक करता एक क्यु आर कोड दिसतो. तो त्या व्यक्तीने पोलिसांनी अडविल्यास दाखवावा. माहिती भरताना देण्यात आलेल्या अटी शर्ती मध्ये खोटी माहिती दिल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल असे सांगण्यात आले आहे. या लिंकवर ९१७ लोकांनी आधारकार्डबाबत खोटी माहिती भरुन परवानगीसाठी अर्ज केल्याचे निदर्शनास आले. त्या लोकांना एस़. एम. एस पाठवून दुरुस्तीची संधी देण्यात आली. या केसेसची छाननी करुन पोलीस उपायुक्त बच्चनसिंग यांनी त्यातील संशयास्पद केसेसमधील माहितीची खात्री करुन योग्य ती कारवाई करण्याच्या सुचना गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप यांना दिल्या होत्या. त्यानुसार ६ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे..........डिजिटल पाससाठी ३ लाखांहून अधिक अर्जपोलिसांनी डिजिटल पासची सुविधा उपलब्ध केल्यावर २८ मार्च ते ९ एप्रिल पर्यंत ३ लाख १८ हजार विनंती अर्ज प्राप्त झाले. त्या अजार्ची पडताळणी करून १ लाख ६३ हजार लोकांना परवानगी देण्यात आली. त्यापैकी १ लाख ७ हजार विनंती अर्ज सुट देण्यात आलेल्या अत्यावश्यक सेवा गटातील आहेत. तर ४७ हजार इतर लोकांना परवागी देण्यात आली आहे. परवानगी देत असताना वैद्यकीय कारणास्तव आलेल्या विनंती अजार्ला प्राधान्य देण्यात आले असून, कॅन्सर पेशंट १५६८, सर्जरी पेशंट १०४३, डायलिसिस पेशंट ३४३, डायबेटीक पेशंट ४१८, प्रसुतीसाठी २६९१, लहान मुलांवरील उपचाराकामी ६१९ अशा परवानग्या देण्यात आल्या आहेत.------------------------------------------------नागरिकांना आवाहन करण्यात येते की,कोरोना विषाणुच्या प्रादुभार्वाच्या अनुषंगाने खोटी माहिती देऊन पास मिळवू नयेत. अन्यथा अशा अर्जदारावरकायदेशीर कारवाई करण्यात येईल. विनाकारण घराबाहेर पडणे टाळा. कोरोनाचीलढाई आपण घरात थांबूनच जिंकू शकतो.- बच्चन सिंग, पोलिस उपायुक्त गुन्हे शाखा.
पुण्यात डिजिटल पास मिळविण्यासाठी तब्बल ९१७ जणांनी दिली आधारकार्डची खोटी माहिती; ६ जणांवर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: April 09, 2020 7:39 PM
डिजिटल पाससाठी ३ लाखांहून अधिक अर्ज
ठळक मुद्देसंशयास्पद केसेसमधील माहितीची खात्री करुन योग्य ती कारवाई करण्याच्या सुचना