बारामती : फेसबुकवर धनगर समाज व बहुजन समाजाचे नेते गोपीचंद पडळकर यांच्यावर अश्लील लिखाण केल्याप्रकरणी संबंधितावर कारवाईची मागणी करण्यात आली आहे.
शशांक तुकाराम मराठे (प्लॉट नंबर २८ टी/७ व अंगणवाडी रोड १२ गोवंडी रोड, शिवाजीनगर मुंबई) याने महाराष्ट्र शशा मराठे या फेसबुक नावाने फेसबुक अकाउंटवरून धनगर समाजाची व बहुजन समाजाचे नेते गोपीचंद पडळकर यांच्यावर अतिशय खालच्या पातळीवर जाऊन अश्लील लिखाण केले आहे. त्यामुळे धनगर समाजाच्या भावना दुखावल्या आहेत. या विकृत बुध्दीच्या लोकांवर कडक कारवाई झाली पाहिजे, शाहू, फुले, आंबेडकर यांच्या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये अशा घटना घडतात हे अतिशय दुर्दैवी आहे, असे निवेदन आज बारामती शहर पोलीस स्टेशनचे निरीक्षक यांना दिले.
या वेळी डॉ. पाटील यांनी पोलिसांत तक्रार दिली. निवेदनावर बापूराव सोलनकर, संपतराव टकले, सुधाकर पांढरे, वसंत घुले, नवनाथ मलगुंडे यांच्या सह्या आहेत.
————————————————