पुणे : गोव्यातील म्हापसा पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या खुनाच्या गुन्ह्यात तब्बल १८ वर्षे फरार असलेल्या आरोपीला सहकारनगर पोलिसांनी खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे ताब्यात घेतले. त्याला गोवा पोलिसांच्या ताब्यात देण्यात येणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक निकम यांनी दिली. दशरथ चतुरसिंग रजपूत (वय ४०, रा. गुलाबनगर, धनकवडी) असे ताब्यात घेण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत म्हापसा पोलिसांना माहिती कळवण्यात आली असून, त्याला गोवा पोलिसांच्या ताब्यात देण्यात येणार आहे. ही कारवाई वरिष्ठ निरीक्षक दीपक निकम यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक चेतन मोरे यांच्या पथकाने केली.(प्रतिनिधी) पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, म्हापसा पोलीस ठाण्यामध्ये १९९९ सालचा रजपूतविरुद्ध खुनाचा एक गुन्हा दाखल आहे. पोलीस ठाण्याचे कर्मचारी इंगळे व येवले यांना खबऱ्याने रजपूत त्याच्या भावाकडे धनकवडीमध्ये येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार, सापळा लावून त्याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडे चौकशीमध्ये तो १८ वर्षांपासून फरार असल्याची माहिती त्याने पोलिसांना दिली.
खुनाच्या गुन्ह्यातील फरारीस अटक
By admin | Published: February 20, 2017 3:08 AM