श्री मयूरेश्वर अभयारण्याशेजारी एक एकर जागेमध्ये हा उपक्रम राबविण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार व एन्व्हार्मेंटल फोरमच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सातव कुटुंबीयांकडून ६४ मी. लांबी आणि १० मी. रूंदीचा अभयारण्यातील वन्यप्राणी व हरणांसाठी या कडक उन्हाळ्यात मुबलक चारा व पाणी असणारे कुंड तयार करण्यात आले आहे. वसा समाजसेवेचा, ध्यास विकासाचा, माणसाबरोबर प्राण्याचा असा हा स्तुत्य उपक्रम आहे.
बारामती तालुक्यातील सुपे गावाच्या जवळ असणाऱ्या श्री मयूरेश्वर अभयारण्यात वन्यप्राण्यांची तहान भागवण्यासाठी सातव कुटुंबीयांकडून अभयारण्या मध्ये वन्यप्राण्यांना पिण्याच्या पाण्याची व चाऱ्याची सोय व्हावी यासाठी हे कुंड तयार केले आहे. या कुंडात साधारण दोन ते सव्वा दोन लाख लिटर पाण्याची क्षमता आहे. तर पाणी पिण्यासाठी हरणांना व वन्यप्राण्यांना कुंडाच्या उथळ भागावर उतरण्यासाठी जागोजागी दगडाचे पिचींग करण्यात आले आहे. तसेच कुंडाच्या आसपासच्या जागेमध्ये वन्यप्राण्यांना खाण्यासाठी काटेरी वनस्पती, गवत, हत्ती घास, लावण्याचे काम सुरु आहे. यासाठी पाण्याची परिस्थिती बघता या चाऱ्याच्या उत्पन्नासाठी ड्रीपचा वापर करण्यात येणार आहे. यासाठी साधारण एक किलोमीटर वरुन पाच इंची पाईप लाईन आणून या कुंडात वन्यप्राण्यांची कायम स्वरुपी पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.तर भटक्या कुत्र्यापासून संरक्षण करण्यासाठी रस्त्याला असणाऱ्या कुंडाच्या बाजूला ३८० फूट लांब आणि ८० फूट रूंद असे सुरक्षा भिंत उभी करण्यात आली आल्याचे बारामती नगरपरिषदेचे गटनेते सातव यांनी सांगितले.
श्री मयूरेश्वर अभयारण्यात सातव कुटुंबीयांनी वन्यप्राणयांसाठी बांधलेले पाण्याचे कुंड१४०४२०२१-बारामती-०२