तालुक्याच्या पूर्व भागातून डिंभा उजवा कालवा, घोडनदी बारमाही पाण्याने वाहत असल्याने अवसरी खुर्द, अवसरी बुद्रुक, गावडेवाडी, मेंगडेवाडी, निरगुडसर, पारगाव, पिंपळगाव या भागांतील शेतकरी वर्षाला तीन ते चार पिके घेत असतात. मार्च महिन्यात उन्हाळी बाजरी काढणीसाठी येत असते. तालुक्यात उन्हाळी बाजरी काढणीच्या कामाला सुरुवात झाली आहे. सध्या पावसाचे वातावरण तयार झाल्याने शेतकऱ्यांची बाजरी काढणी व मळणीच्या कामासाठी लगबग चालू आहे. बाजरी काढणीसाठी पूर्वी मावळ भागातून मावळे येत होते. मात्र चालू वर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मावळे येत नसल्याने स्थानिक महिला मजुरांकडून बाजरी काढली जात आहे. त्यासाठी महिलांना एका दिवसाची २५० ते ३०० रुपये इतकी मजुरी द्यावी लागते. एका बाजरीच्या पोत्यासाठी साधारण ३०० रुपये इतका खर्च येतो. किराणा दुकानात १०० किलोचे पोते १८०० ते २००० रुपयाला विकत मिळते. त्यामुळे शेतकऱ्यांना बाजरी पिकविण्यापेक्षा ती विकत घ्यायला परवडते.
०९ अवसरी
आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात उन्हाळी बाजरी काढणी व मळणीच्या कामाला मशिनद्वारे सुरुवात झाली आहे.