हुतात्मा बाबू गेनू जलाशय (डिंभे धरण) १०० टक्के भरले आहे. तसेच घोडनदी, उजव्या व डाव्या कालव्यांना पाणी सोडले आहे. त्यामुळे शाश्वत पाणी उपलब्ध झाले आहे. नगदी पैसे मिळवून देणारे पीक म्हणून बटाटा पीक आहे. कोरोनामुळे बटाटा लागवड करण्यासाठी मजुरांची टंचाई आहे. त्यामुळे शेतकरी ट्रॅक्टरच्या साह्याने लागवडी करत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. वीस एकर क्षेत्रात बटाटा बियाण्याची लागवड केली आहे. लागवडीसाठी मजूर उपलब्ध होत नसल्याने यांत्रिकीकरणाचा वापर बटाटा लागवड करत आहेत. अकराशे रुपये प्रति तास याप्रमाणे ट्रॅक्टरद्वारे लागवडीचा दर आहे. यंत्राद्वारे लागवड केल्यामुळे बियाणे जमिनीत गाडून सरी वरंबा तयार होतो. तसेच वेळ, पैसा व खर्चात मोठ्या प्रमाणात बचत होते, असे प्रगतिशील शेतकरी गणपत ढोबळे यांनी सांगितले.
बटाटा वाणाचे बाजारभाव यावर्षी कमी आहेत. तसेच धरण भरल्याने शाश्वत पाणी उपलब्ध झाले आहे. त्यामुळे बटाटा लागवड क्षेत्रात वाढ होईल. जवळपास २५० हेक्टर क्षेत्रात रब्बी हंगामात लागवड होईल असा अंदाज आहे, असे कृषी मंडल अधिकारी प्रकाश पवार यांनी सांगितले.
१६ निरगुडसर
ट्रॅक्टरच्या सहाय्याने बटाटा लागवड करताना शेतकरी.