तालुक्यात पूर्वी पावसाळी भुईमूग पिकाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जात होते. मात्र, मागील काही वर्षांपासून शेतकरी उन्हाळी बाजरी व भुईमूग पिकांकडे वळला आहे. या पिकामुळे जमीन तयार होते. तसेच कमी पाण्यात ही पिके येत असल्याने उन्हाळी बाजरी व गहू पीक घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. साधारणता फेब्रुवारी व मार्च या दोन महिन्यांत उन्हाळी भुईमुगाची लागवड केली जाते.जेथे पाणी उपलब्ध आहे तेथे शेतकरी प्रामुख्याने हे पिके घेतो.
भुईमूग पिकाचे बहुतेक बियाणे हे घरच्या घरी तयार केलेले असते. शेतातील उत्पादित भुईमूग शेंगा त्यासाठी राखून ठेवल्या जातात.खते औषधे दुकानात ५५,५१,१०८ या जातीचे बियाणे उपलब्ध असून त्यास किलोला १३० ते १६० रुपये असा भाव असल्याची माहिती महेश मोरे यांनी दिली, तसे पाहिले तर उन्हाळी भुईमूग पिकाला एकरी खर्च कमी येतो. एकरी २० ते २५ किलो बियाणे, मजुरी, थोडी खताची मात्रा एवढा खर्च येत असल्याने शेतकऱ्यांना जास्त भांडवल गुंतवावे लागत नाही.
सध्या आंबेगाव तालुक्यात उन्हाळी भुईमूग काढणी अंतिम टप्प्यात आली आहे.मागील पंधरा दिवसांपासून पावसाने पूर्णपणे उघडीप दिली आहे.त्यामुळे शेतकऱ्यांना भुईमूग काढणी करणे शक्य झाले आहे.परिसरातील महिला भुईमूग काढणीसाठी येत असून त्यांना मोबदला म्हणून भुईमूग शेंगा दिल्या जातात. पाऊस सुरू होण्यापूर्वी उन्हाळी भुईमूग पीक काढून घेण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे.भुईमुगाचा पाला जनावरांचे खाद्य म्हणून उपयोगात येत असल्याने शेतकऱ्यांना दुहेरी फायदा मिळतो.
चाैकट.........
एक किलो भुईमूग बियाण्याला साधारणता एक पोते भुईमूग शेंगा निघतात. म्हणजेच एकरी २० ते २२ पोते एवढे अपेक्षित उत्पादन निघाले, तरी शेतकऱ्यांना हे पीक परवडते. उन्हाळी भुईमूग पीक सर्वसाधारणपणे तीन महिन्यांत येते. शेतात निघालेल्या भुईमूग शेंगांचा उपयोग शक्यतो वर्षभर घरी खाण्यासाठी केला जातो. काहीजण शेंगदाण्याचे तेल तयार करतात.उरलेले भुईमूग पीक विक्रीसाठी बाजारात नेले जाते.सध्या बाजारात शेंगदाणा महागला असल्याने अनेक शेतकरी उन्हाळी भुईमूग पीक घेत असतात.पावसाळी भुईमूग पिकाऐवजी उन्हाळी भुईमूग पीक परवडत असल्याचा शेतकऱ्यांचा अनुभव आहे.
११ मंचर
उन्हाळी भुईमूग पिकाची काढणी अंतिम टप्प्यात आली आहे.