रोजगाराभिमुख शहरामुळे प्लॉटींग प्लॉटींग व्यवसायात तेजी
................,,,,,,.........................मुख्य संचालक, ʻमंगलमुर्ती वास्तुʼचे
मुख्य संचालक प्रफुल्लशेठ शिवले यांचे प्रतिपादन
......................
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : कोरोनाचा कहर ओसरु लागला तसा जमिन खरेदी-विक्री, गुंठेवारी आणि प्लॉटींग या क्षेत्रात किमान पुणे जिल्ह्यात तरी बाजार चांगलाच तेजीत येवू लागला आहे. पुण्याचे रोजगार-मुल्य हे संपूर्ण महाराष्ट्र जाणतो. शिक्षण, औद्योगिक, आयटी, शेती, उद्योग, व्यवसाय या तमाम क्षेत्रात पुण्याने कोरोनानंतर तात्काळ स्वत:ला सावरल्याने या क्षेत्राकडे गुंतवणूक म्हणून पाहणारे आणि घराचे स्वप्न घेवून थांबलेले सगळेच सक्रीय होवू लागले आहेत, असे प्रतिपादन वाघोली (ता.हवेली) येथील मंगलमूर्ती वास्तु कंपनीचे मुख्य संचालक प्रफुल्लशेठ शिवले यांनी केले.
कोरोनामुळे जमिन खरेदी-विक्री, गुंठेवारी आणि प्लॉटींग क्षेत्रात मंदी आल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून होती. मात्र वास्तवात कोरोनामुळे सरकारी पातळीवर लॉकडाऊन, सोशल डिस्टंसिंग आणि कोरोना रोखण्याच्या विविध उपाययोजनांमुळे या क्षेत्रात उलाढाल थंडावणे ही केवळ अपरिहार्यता होती. खरे तर पुणे जिल्ह्यातील आणि विशेषत: पीएमआरडीए हद्दीतील सुमारे ८२५ गावांमध्ये विकासाची गती इतकी प्रचंड आहे की, या क्षेत्रात मंदी येणे केवळ अशक्य कारण लोकसंख्येची घनता ज्या पध्दतीने या सर्वच गावांमध्ये आणि विशेषत: पुण्याजवळील वाघोली, केसनंद, लोणी-कंद, कोरेगाव-भिमा, शिक्रापूर आदी भागांमध्ये वाढलेली आहे आणि त्याची गतीही वाढती आहे. त्या प्रमाणात जमिनमुल्यांची वाढ ही नैसर्गिक आहे. त्याचाच परिणाम म्हणजे या भागात राहणा-या प्रत्येकाला स्वत:चे घर, प्रॉपर्टी असण्याचे स्वप्न आणि वास्तविक गरज हे थांबणारे नाही.
नव्याने पुणेकर होणारांचे योगदान
पुण्याजवळील कुठल्याही गावातील एका फ्लॅटची किंमत आणि त्याच किंमतीत स्वत:चा काही गुंठ्यांमध्ये प्लॉट घेवून स्वत:ला हवे तसे घर, बंगला बांधण्याची नव्याने पुणेकर होवू पाहणा-यांची मानसिकता हीच मुळे या क्षेत्राची खरी उर्जा आहे. कारण गावाकडे ऐसपैस राहणे, उद्योग-व्यवसायासाठी पुण्याजवळ स्वत:ची जागा असणे ही मानसिकताच मुळी या क्षेत्राला उर्जित करण्याचे महत्वाचे कारण आहे आणि तेच कारण कोरोनानंतरच्या काळात लगेच हे मार्केट सक्रीय होण्यासाठी महत्वपूर्ण ठरले आहे.
मेट्रो, विमानतळामुळे चांगली गती
पुणे मेट्रोचे काम कोरोनाकाळतही पूर्वीच्याच गतीने सुरू राहिले आणि पुरंदरचे विमानतळही लवकर उभे राहील हा विश्वास नवीन महाआघाडी सरकारने पुणेकरांसह महाराष्ट्राला दिल्याने पुण्याकडचा ओघ प्रचंड वाढलेला आहे. पर्यायाने रोजगाराभिमुख रहिवास हा पुण्याजवळील प्रत्येक गावाचा एक अविभाज्य घटक झाला असून तो मेट्रो आणि विमानतळाने वृध्दींगत केलाय. याचाच परिणाम कोरोनानंतरच्या काळात जमिन खरेदी-विक्री, गुंठेवारी आणि प्लॉटींग या क्षेत्राने नव्याने उभारी घेतल्याचे चित्र मी सध्या अनुभवत आहे, असेही शिवले म्हणाले.