पुणे : पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयातर्फे अकरावी प्रवेशप्रक्रियेची तयारी सुरू करण्यात आली असून, यंदा पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रांत नवीन १४ कनिष्ठ महाविद्यालये अकरावी प्रवेशप्रकियेत सहभाग घेणार आहेत. त्यामुळे यंदा अकरावीच्या प्रवेश क्षमतेमध्ये वाढ होईल.पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयातर्फे गरवारे महाविद्यालयामध्ये अकरावी प्रवेशासाठी आवश्यक असलेल्या तुकडीवाढ, शुल्कवाढ आदी माहिती जमा करण्यात आली. त्यात सुमारे ५० कनिष्ठ महाविद्यालयांनी पालक शिक्षक संघाची परवानगी न घेता शुल्कवाढ केल्यामुळे या महाविद्यालयांचे अकरावी प्रवेशाचे प्रस्ताव फेटाळण्यात आले. (प्रतिनिधी)गेल्या वर्षी २०५ कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अकरावी प्रवेशाच्या ६७ हजार ६६५ जागा उपलब्ध होत्या; परंतु यंदा १४ नवीन कनिष्ठ महाविद्यालयांनी प्रवेशप्रकियेसाठी प्रस्ताव सादर केले आहेत. त्यामुळे यंदा २१९ कनिष्ठ महाविद्यालयांत अकरावीचे प्रवेश दिले जाणार आहेत. परिणामी, यंदा अकरावी प्रवेश क्षमतेमध्ये आणखी वाढ होईल.- बाळासाहेब ओव्हाळ, सहायक शिक्षण संचालक
अकरावीची प्रवेश क्षमता वाढणार
By admin | Published: April 17, 2015 12:44 AM