शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
2
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
3
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
4
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
5
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
6
"देवेंद्र फडणवीस हे भारतीय राजकारणाचे भविष्य"; केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांचे विधान
7
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
8
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
9
"बंद सम्राटांना कायमचं घरात बंद करायची वेळ आलीय"; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

पुणे मेट्रो स्थानकात प्रवाशाचा मृत्यू; पोलीस करणार सरकत्या जिन्यांचा तपास

By ऑनलाइन लोकमत | Published: July 02, 2024 8:59 AM

पुण्याच्या मेट्रो स्थानकात एका प्रवाशाचा सरकत्या जिन्यावरुन पडून मृत्यू झाल्याची घटना जिल्हा न्यायालय स्थानकात घडली.

Pune Metro : पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पुणे मेट्रो स्थानकात अपघात झाल्याने एका व्यक्तीचा मृत्यू झाला. सरकत्या जिन्यावरुन हा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. जिल्हा न्यायालय या मेट्रो स्थानकावर हा अपघात घडला असून त्यात एका ४० वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. मात्र ही घटना नेमकी कशी घडली याचा तपास आता पोलीस सीसीटीव्हीच्या माध्यमातून करणार आहेत.

सोमवारी संध्याकाळी पुण्याच्या जिल्हा न्यायालय मेट्रो स्थानकात हा सगळा प्रकार घडला. अचानक सरकत्या जिन्यावरुन पडल्याने या प्रवाशाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली. जिन्यावरुन पडल्यानंतर त्या व्यक्तीला तात्काळ रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र रुग्णालयात पोहोचण्याआधीच त्याचा मृत्यू झाला होता.  मनोज कुमार (वय ४०) असे या या प्रवाशाचे नाव आहे. 

मनोज कुमार हे संध्याकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास जिल्हा न्यायालय मेट्रो स्थानकातील सरकत्या जिन्यावरून जात होते. त्यावेळी ते अचानक जिन्यावरुन खाली पडले. त्यावेळी तिथल्या सुरक्षारक्षकांनी हा सगळा प्रकार पाहिला आणि त्यांनी मनोज कुमार यांनी मेट्रो स्थानकातील वैद्यकीय कक्षात आणले. तिथल्या डॉक्टरांनी मनोज कुमार यांच्यावर तातडीने प्राथमिक उपचार केले. मात्र त्यांची परिस्थिती गंभीर असल्याचे पाहून रुग्णालयात हलवण्याचा निर्णय घेतला. मात्र रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच कुमार यांचा मृत्यू झाला.

दुसरीकडे मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी शिवाजीनगर पोलिसांना या घटनेची माहिती दिली. पोलिसांनी मनोज कुमार यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवला. मात्र मनोज कुमार यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही. डॉक्टरांच्या शवविच्छेदनातून कुमार यांच्या मृत्यूचे नेमके कारण समोर येईल. दरम्यान, मनोज कुमार हे सरकत्या जिन्यावर कसे पडले, याचा तपास पोलीस करत आहेत. त्यामुळे स्थानकातील सीसीटीव्ही फुटेजही तपासण्यात येणार आहेत.

टॅग्स :PuneपुणेMetroमेट्रोPoliceपोलिसAccidentअपघात