शहरं
Join us  
Trending Stories
1
मतांमधील तफावतीबाबत 'लोकमत'च्या बातमीवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण, म्हणाले...
2
आग्रा-लखनौ एक्स्प्रेस-वेवर भीषण अपघात, सैफई मेडिकल युनिव्हर्सिटीमधील ५ डॉक्टरांचा मृत्यू   
3
मुख्यमंत्रि‍पदाच्या स्पर्धेतून एकनाथ शिंदेंची माघार?; भाजप हायकमांडच्या भूमिकेनंतर चर्चांना उधाण
4
'एक'नाथ हैं तो सेफ है' घोषणेवर भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
5
युद्ध थांबले! इस्रायल आणि हिजबुल्लामध्ये युद्धविराम, दोन्ही देशात करार झाला; वाचा सविस्तर
6
६५ टक्के आमदारांवर गंभीर गुन्हे, २७७ करोडपती; जाणून घ्या, शिक्षित आमदार किती?
7
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
8
SIP Vs PPF Vs ELSS: ₹१.५ लाखांच्या गुंतवणुकीवर पहिलं कोण बनवेल कोट्यधीश; पाहा गणित, मिळतील ₹८.११ कोटी
9
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
10
मतदान करत नाही, मग 'हे' वाचाच; स्वतंत्र वाहन, रात्रभर २५० किमी प्रवास अन् पोहोचलं एक मत..
11
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
12
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
13
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
14
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
15
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
16
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
17
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
18
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
19
विद्यार्थ्यांच्या नोंदणीसाठी शिक्षकांचे 'अपार' कष्ट; २५ टक्के नोंदणी अपूर्ण
20
शेती आणि शेतकरी - यंदाच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतून दोघेही हद्दपार!

चुकीच्या बाजूने केलेल्या ' ओव्हर टेकिंग' मुळे झाला घात

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2019 11:33 AM

वाहने एकमेकांना ओव्हरटेक करीत असतानाचा त्यांनी उजव्या बाजूचाच वापर करणे अपेक्षित आहे...

ठळक मुद्देओव्हरटेक करताना सिग्नल देणे आवश्यक महामार्गावर 60 ते 70 टक्के ओव्हरटेकींग केले जाते डाव्या बाजूने

पुणे : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर रविवारी रात्री पावणे अकराच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात संचेती रुग्णालयाचे मणका विकार तज्ञ डॉ. केतन खुर्जेकर यांचा मृत्यू झाला असून या अपघाताला व्होल्वो बसने चुकीच्या पद्धतीने केलेले  ह्यओव्हरटेकींगह्ण कारणीभूत ठरल्याचे तपासात समोर आले आहे. तसेच डॉ. खुर्जेकर यांच्या चालकानेही पंक्चर काढण्यासाठी चुकीच्या ठिकाणी उभी केल्याचेही पोलिसांनी सांगितले.महामार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संचेती रुग्णालयाचे मणका विकार तज्ज्ञ डॉ. खुर्जेकर हे डॉ. जयेश बाळासाहेब पवार आणि डॉ. प्रमोद भिलारे यांच्यासह मुंबईला मेडिकल कॉन्फरन्ससाठी गेलेले होते. कॉन्फरन्स आटोपल्यावर पुण्याकडे परत येत असताना त्यांच्या मोटारीचे टायर पंक्चर झाले. पंक्चर काढण्यासाठी चालक ज्ञानेश्वर विलास भोसले यांनी मोटार रस्त्याच्या कडेला लावली. परंतू ही गाडी ज्याठिकाणी उभी होती ती जागा वाहतुकीच्यादृष्टीने थांबण्यासाठी सुरक्षित नव्हती. चालक भोसले मोटारीचे चाक बदलत असताना डॉ. खुर्जेकर त्यांच्या शेजारी उभे होते. तर एक डॉक्टर चालकाच्या बाजूच्या सीटवर गाडीमध्येच बसून होते. दुसरे एक डॉक्टर बाहेरच्या बाजूस गाडीजवळ उभे होते. पाठीमागून भरधाव आलेल्या व्होल्वो बसने या मोटारीला धडक दिली. ही धडक वाहनाच्या उजव्या बाजूने बसली. व्होल्वो बस भरधाव येत असताना बससमोर एक वाहन आले. या वाहनाला ओव्हरटेक करण्यासाठी चालकाने बस डाव्या बाजुला घेतली. वास्तविक उजव्या बाजूने वाहनाला ओव्हरटेक करणे आणि त्यासाठी आवश्यक सिग्नल देणे आवश्यक होते. बस डाव्या बाजुला आल्यानंतर त्याच लेनवर डॉ. खुर्जेकर यांची मोटार उभी होती. चालकाला बसचा वेग नियंत्रित न करता आल्याने बसची धडक या मोटारीला आणि मोटारीजवळ उभ्या असलेल्या डॉक्टरांसह चालक भोसले यांना बसली. या अपघातात डॉ. खुर्जेकर आणि चालक भोसले यांचा जागीच मृत्यू झाला. अन्य दोन डॉक्टर्सवर उपचार सुरु आहेत.====द्रुतगती मार्गावर लेन शिस्त पाळली जात नसल्याचे या घटनेवरुन पुन्हा एकदा समोर आले आहे. वाहने एकमेकांना ओव्हरटेक करीत असतानाचा त्यांनी उजव्या बाजूचाच वापर करणे अपेक्षित आहे. ओव्हरटेक करताना सिग्नल देणे आवश्यक आहे. परंतू, महामार्गावर 60 ते 70 टक्के ओव्हरटेकींग हे डाव्या बाजूने केले जाते. त्यामुळे वाहनचालकांनीही खबरदारी बाळगणे आवश्यक आहे. ====... तर अपघात टळला असतापंक्चर काढण्यासाठी ज्याठिकाणी मोटार उभी करण्यात आलेली होती, ती जागा सुरक्षित नव्हती. वास्तविक तेथे गाडी उभी केल्यावर मोटारीतील चालक व प्रवाशांनी मोटारीपासून दूर सुरक्षित ठिकाणी उभे राहणे आणि मोटारीपासून काही अंतरावर पाठीमागून येणाºया वाहनांना समजेल असा सिग्नल देणे आवश्यक होते. हा सिग्नल मिळाला असता तर आणि बस चालकाने चुकीच्या पद्धतीने ओव्हरटेक केले नसते तर कदाचित हा अपघात टाळता आला असता.====जर वाहने पंक्चर झाली अथवा वाहनामध्ये बिघाड झाल्यास वाहन रस्त्याच्या कडेला लावून तात्काळ 9822498224 या क्रमांकावर संपर्क साधावा. महामार्ग पोलिसांकडून तात्काळ मॅकेनिक, क्रेन आणि रुग्णालयाची सोय केली जाते. यासोबतच पोलिसांची आणि डेल्टा फोर्सची गस्तही सुरु असते. द्रुतगती मार्गावर वाहने थांबविण्यास मनाई आहे. त्यामुळे आपत्कालीन परिस्थितीत वाहन थांबविण्याची वेळ आलीच तर वाहनापासून दूर सुरक्षितस्थळी थांबावे. महामार्ग पोलिसांशी संपर्क साधावा. - मिलींद मोहिते, अधीक्षक, महामार्ग पोलीस, पुणे

टॅग्स :Puneपुणेhighwayमहामार्गAccidentअपघातDeathमृत्यूdoctorडॉक्टर