युगंधर ताजणे लोकमत न्युज नेटवर्क पुणे -मुंबई एक्सप्रेस वे वर भरधाव वेगाने वाहने हाकणा-या वाहनांमुळे अपघाताचा धोका वाढला आहे. नियमांकडे दुर्लक्ष करुन बेदरकारपणे वाहने चालविणा-या 65% कार आणि ट्रक चालक ठरवून दिलेल्या वेग मयार्देचे उल्लंघन करीत असल्याचे दिसून आले आहे. तर या द्रुतगती मार्गावर पुढे आणि मागे बसणारे 42.3% प्रवासी हे सीट बेल्टच वापरत नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. सेव्ह लाईफ फाऊंडेशन या संस्थेने 2018 दरम्यान केलेल्या सर्वेक्षणातून अपघात व उपाययोजना याविषयी अनेक बाजुंचा गांभीर्याने विचार करावा लागणार आहे. या सर्वेक्षणाकरिता सर्व प्रकारच्या वाहनांमधील 800 प्रवाशांचा अभ्यास करण्यात आला. त्यात प्रवाशांच्या तसेच तातडीच्या वाहनांमधील (पोलीस आणि रुग्णवाहिका) अधिकारी यांच्याही द्रुतगती मार्गावरील प्रवाशांच्या वर्तुणकीकडे लक्ष वेधणा-या प्रत्यक्ष मुलाखती घेण्यात आल्या. पुणे - मुंबई द्रुतगती मार्गावरील रस्ते सुरक्षा सुधारण्याकरिता रात्रीच्या वेळी अपघात घडल्यानंतर तातडीने मदतीच्या उपाययोजना पोहचणे गरजेचे असल्याचे मत 53.3% प्रवाशांनी व्यक्त केले आहे. सर्वेक्षणातून मिळालेल्या माहितीनुसार एक्सप्रेस वे वर ताशी 80 किमी एवढी वेगमयार्दा निश्चित केली आहे. मात्र 65 % वाहनचालक कार आणि ट्रकचालक या नियमाचे उल्लंघन करताना आढळुन आले आहे. तसेच चालक किंवा प्रवासी अशा दोन्ही विभागात मोडणा-या 18 ते 25 वयोगटातील 46 % तरुण प्रवाशांनी सीट बेल्ट लावत नसल्याचे मान्य केले आहे. सर्वेक्षणाविषयी अधिक माहिती देताना फाऊंडेशनचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी पियुष तिवारी म्हणाले,द्रुतगती मार्गावर रस्ते सुरक्षा आणि तातडीची वैद्यकीय मदत मिळविण्यासाठी करण्यात येणा-या उपाययोजनांच्या अंमलबजावणीमध्ये सुधारणा होण्याची गरज आहे. गेल्या काही महिन्यांपासून सरकारी यंत्रणांकडून द्रुतगती मार्गावर राबविण्यात आलेली इर्मजन्सी सर्व्हिसची उपाययोजना आणखी सक्षम झाल्यास परिस्थितीत फरक पडेल. तसेच या मार्गावर अधिकृत वेगमर्यादा फलक सुचना ठळकपणे लावण्यात याव्यात. जेणेकरुन वाहतूक पोलीसांना वेग मर्यादेचे उल्लंघन करणा-यांना रोखता येईल. आणि जीवितहानी टाळता येईल....................................* सर्वेक्षण अहवालातून समोर आलेल्या ठळक गोष्टी - द्रुतगती मार्गावरील अपघात आणि मृत्यु याला कारणीभुत असलेले प्रमुख कारण म्हणजे चालकाला गाडी चालवताना येणारा थकवा.- साधारण 71 % जड वाहन चालकांनी आणि 50 % ट्रक चालकांनी द्रुतगती मार्गावर गाडी चालवताना आपल्याला प्रचंड झोप आणि थकवा येत असल्याचे सांगितले. - अल्कोहोलचा अंमल (46%) तर अतिवेग (38%) हे घटक देखील महत्वाचे असल्याचे सांगण्यात आले.- तातडीच्या वेळी द्रुतगती मार्गावर आपण नेमके कुठे आहोत हेच कळत नसल्याचे मत सर्वेक्षणातील 69% जणांनी नोंदविले.- सर्वाधिक धक्कादायक बाब म्हणजे केवळ 2.8 % प्रतिसादकांना द्रुतगती मार्गावरील तातडीचा 9822498224 हा मदत क्रमांक माहिती होता. - 50 % हून अधिक लोकांना 108 हा रुग्ण वाहिकेचा क्रमांक पाठ असल्याचे दिसून आले.
वेग मर्यादेचे उल्लंघन एक्सप्रेस वे वर ठरतेय जीवघेणे
By ऑनलाइन लोकमत | Published: December 08, 2018 4:04 PM
पुणे -मुंबई एक्सप्रेस वे वर भरधाव वेगाने वाहने हाकणा-या वाहनांमुळे अपघाताचा धोका वाढला आहे.
ठळक मुद्देमृत्युचे प्रमाण कमी हवी प्रभावी उपाययोजना सव्ह लाईफ फाऊंडेशनचा अभ्यास अहवालपुणे -मुंबई एक्सप्रेस वे वर भरधाव वेगाने वाहने हाकणा-या वाहनांमुळे अपघाताचा धोका या सर्वेक्षणाकरिता सर्व प्रकारच्या वाहनांमधील 800 प्रवाशांचा अभ्यास द्रुतगती मार्गावरील प्रवाशांच्या वर्तुणकीकडे लक्ष वेधणा-या प्रत्यक्ष मुलाखतीवैद्यकीय उपाययोजनांच्या अंमलबजावणीमध्ये सुधारणा गरज