शहरं
Join us  
Trending Stories
1
हाती 'धनुष्यबाण', कुडाळमधून विजयाचा निर्धार; शिवसेना प्रवेशानंतर निलेश राणे भावूक
2
मावळमध्ये भाजपाचा सांगली पॅटर्न; राष्ट्रवादीच्या उमेदवाराला धक्का देण्याची तयारी
3
मनसेची १३ जणांची तिसरी यादी जाहीर; नाशिकमध्ये भाजपाला अन् पालघरमध्ये काँग्रेसला धक्का
4
शिवसेनेच्या पहिल्या यादीत चूक, उमेदवार बदलणार?; राऊतांनी पत्रकार परिषदेत केले कबूल
5
अखेर ठरलं! ८५-८५-८५ मविआच्या फॉर्म्युल्यावर शिक्कामोर्तब; उर्वरित जागांचं गणित कसं असणार?
6
'सीमेवरील शांततेला प्राधान्य', पंतप्रधान मोदी आणि शी जिनपिंग यांच्यात 50 मिनिटांची बैठक
7
Mahayuti Seat update: साताऱ्यात महायुतीचा विद्यमान आमदारांवरच भरोसा! 
8
इस्रायलची मोठी कारवाई; हिजबुल्लाच्या नसरल्लाहनंतर आता हाशिम सफीद्दीनचाही केला खात्मा
9
Maharashtra Election 2024: भाजपसमोर बंड थंड करण्याचे आव्हान; नाशिकमध्ये समीकरण काय?
10
मोठी बातमी: CM शिंदेंविरोधात केदार दिघे; ठाकरेंच्या शिवसेनेकडून ६५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर!
11
तुर्कीची राजधानी अंकारामध्ये मोठा दहशतवादी हल्ला; अनेकांचा मृत्यू
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : सकाळी पक्षप्रवेश अन् संध्याकाळी मिळालं तिकीट; के.पी. पाटलांना दिली उमेदवारी; शाहूवाडीतही शिलेदार मैदानात उतरवला
13
मुंबईतील 'या' १३ जागांवर ठाकरेंचे शिलेदार ठरले; शिवडी मतदारसंघात ट्विस्ट? 
14
जागावाटपाआधीच ठाकरेंकडून AB फॉर्म वाटप; नाशिक मध्य मतदारसंघात काँग्रेस बंडखोरी करणार
15
जालन्यात शिवसेनेच्या अर्जुन खोतकरांविरोधात रावसाहेब दानवेंच्या भावाने ठोकला शड्डू
16
Madha Vidhan Sabha 2024: चार वेळा काँग्रेस, पाच वेळा राष्ट्रवादी, शेकापला एकदा मिळाली संधी!
17
अद्भुत! झिम्बाब्वेने ट्वेंटी-२० मध्ये केल्या तब्बल ३४४ धावा; सिकंदर रझाची झंझावाती खेळी
18
Maharashtra Vidhan Sabha Election : बारामतीचं ठरलं! काका विरोधात पुतण्या निवडणूक लढणार? जितेंद्र आव्हाडांनी दिले संकेत
19
Virat Kohli Record : पुण्याच्या मैदानात किंग कोहलीच्या निशाण्यावर असतील हे ५ विक्रम 
20
फडणवीसांची शिष्टाई, राज पुरोहित आणि राहुल नार्वेकरांमध्ये दिलजमाई, कुलाब्यातील बंड शमवण्यात भाजपाला यश 

सासवडजवळ रिक्षा विहिरीत पडून अपघात; तीन ठार तर दोन जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2023 7:14 PM

रिक्षातील प्रवासी पुणे येथील धायरीचे, मृतात नवविवाहीत दाम्पत्य.

सासवड: पुणे येथील धायरीहून जेजुरी येथे देवदर्शनासाठी आलेल्या रिक्षाला सासवडजवळ बोरावके मळ्याजवळ अपघात होऊन नवदांपत्यासह तिघा जणांचा जागेवरच मृत्यू झाला असून, दोन जण जखमी झाले आहेत. पुरंदर तालुक्यातील पुणे पंढरपूर महामार्गावर सासवडजवळ असलेल्या बोरावके मळा येथील वळणावरील एका विहिरीमध्ये रिक्षा क्रमांक (MH-12QE -7706) गेल्याने या रिक्षामधील तिघा जणांचा जागेवरच मृत्यू झाला. तर दोन जणांना वाचवण्यात सासवड पोलिसांना यश आले आहे.

या अपघातामध्ये श्रावणी संदीप शेलार (वय १७) रोहित विलास शेलार(वय-२३)-वैष्णवी रोहित शेलार.(वय -१८) त्यांचा जागेवर मृत्यू झाला असून आदित्य मधुकर घोलप (वय -२२) आणि शितल संदीप शेलार. (वय-३५) हे जखमी झालेत. या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार पुणे येथील धायरीहून जेजुरी येथे देवदर्शनासाठी नवविवाहित आले होते. त्यांच्याबरोबर अन्य तिघे होते. यातील तिघांचा या अपघातामध्ये मृत्यू झाला. मंगळवार दि. २५ रोजी रात्री आठ वाजल्याच्या सुमारास रिक्षा विहिरीमध्ये पडली असावी आणि यानंतर आज सकाळी सात वाजता याबाबतचा तपास पोलिसांना लागला असून या रस्त्यावरून कामासाठी निघालेल्या तरुणांना या विहिरीतून वाचवा वाचवा असा आवाज आला.

या तरुणांनी या विहिरीत डोकावून पाहिले या असता त्यांना या ठिकाणी दोन व्यक्ती विहिरीच्या कडेला असलेल्या दिसल्या. यानंतर याबाबतची माहिती त्यांनी सासवड पोलिसांना दिली सासवड पोलिसांनी या दोघांसह इतर तिघांना भोर येथील रेस्क्यू टीम, जेजूरी व सासवड येथील अग्निशमन दलाच्या कर्मचार्यांच्या साहय्याने क्रेनद्वारे बाहेर काढले. यातील तिघांचा जागेवरच मृत्यू झाला.

आपल्या नवीन संसाराला सुरुवात करण्यापूर्वीच या नवोदीत दाम्पत्याला आपला जीव गमवा वा लागला. सोमवारी रात्री सात वाजेपर्यंत या नवीन दाम्पत्याने त्यांच्या घरच्या लोकांची संपर्क होता. मात्र रात्री आठ वाजल्यानंतर त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. त्यामुळे त्यांच्या घरचे देखील चिंतेत होते. आज सकाळी त्यांनी सासवड पोलीस स्टेशनमध्ये याबाबतची माहिती दिली होती. यानंतर या विवाहित दांपत्यांची रिक्षा ही विहिरीत पडल्याचं आढळले . याबाबतचा अधिकचा तपास सासवड पोलीस करत आहेत.

टॅग्स :Accidentअपघात