पळसदेव (जि. पुणे) : तुळजापूर येथून देवदर्शनाहून परतणाऱ्या निगडीतील एका कुटुंबावर काळाने झडप घातली. टायर फुटल्याने स्कार्पिओ मोटार पाच पलट्या खात विरूद्ध दिशेला येऊन दुसºया मोटारीला धडकली. या भीषण अपघातात पाच जण जागीच ठार तर दोन जण जखमी झाले. दुसºया वाहनातील पाच जण जखमी झाले आहेत.पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर डाळज नंबर १ गावच्या हद्दीत (ता. इंदापूर) शुक्रवारी सायंकाळी साडेपाच वाजता हा अपघात झाला. अपघाताची भीषणता इतकी तीव्र होती की, मोटारीचा चक्काचूर झाल्याने दोन जणांचे मृतदेह मोटारीचा पत्रा गॅस कटरने कापून एक तासानंतर बाहेर काढण्यात आले.शीतल संदीप गायकवाड (वय ३२), संदीप प्रकाश गायकवाड (४०), आभिराज संदीप गायकवाड (५), सुनिता प्रकाश गायकवाड (५८), प्रकाश रामचंद्र गायकवाड (६७, सर्व राहणार नाना नानी पार्क, यमुना नगर, निगडी) अशी मृतांची नावे आहेत. यात पती-पत्नी, मुलगा-सून व नातू यांचा समावेश आहे.भरधाव वेग हाच अपघाताला कारणीभूत ठरल्याचे पोलिसांनी सांगितले.
तुळजापूरहून परतताना अपघात; एकाच कुटुंबातील ५ ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2018 5:43 AM