लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : पौड फाट्यावरील वीर सावरकर उड्डाणपुलावर दुचाकीचे नियंत्रण सुटल्याने पूलावरून खाली पडून रायडर आशुतोष फडके याचा जागीच मृत्यू झाला. डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. सोमवारी सकाळी ही दुर्घटना घडली.आशुतोष दत्तात्रय फडके (वय ३५, रा. विजया सोसायटी, आशिष गार्डन कोथरूड, पुणे) हा स्वत: उत्तम रायडर होता. हेल्मेट घालण्याच्या नियमाचे काटेकोरपणे पालन करूनही तो वाचू शकला नाही. फडके आॅटोमोबाईल्सचा मालक असलेला आशुतोष केटीएम दुचाकीवरून सांगवी येथील मित्राच्या घराकडून कोथरूड डेपोकडे जात असताना हा अपघात झाला.आशुतोष हा दुचाकींसह चारचाकी स्पोर्टी वाहने चालवण्याचा शौकीन होता. त्याने जगातील सर्वोच्च शिखरांपैकी एक असलेल्या खारदुंगला टॉपची यशस्वी चढाई केली होती. दोन अपत्ये असलेल्या आशुतोषला विविध उंच ठिकाणांवर दुचाकीने भ्रमंती करण्याची आवड होती. त्याने कारगिलसारख्या ठिकाणी देखील दुचाकीने प्रवास केला होता.
रायडर आशुतोष फडके याचा अपघाती मृत्यू
By admin | Published: May 16, 2017 2:25 AM