प्रकाश भीमराव वरूडकर (वय ५०, रा. सहकारनगर, यवत, ता. दौंड) असे मृत्यू झालेल्या व्यापाऱ्याचे नाव आहे. शुक्रवारी (दि.२४) सकाळी १०.३० च्या सुमारास प्रकाश वरूडकर हे पुणे-सोलापूर महामार्ग ओलांडत असताना भरधाव वेगात आलेला टेम्पोने त्यांना धडक दिली. या घटनेत वरूडकर यांना डोक्यासह हातपाय व कमरेस गंभीर दुखापत होऊन त्यांचा मृत्यू झाला. प्रकाश वरूडकर यांचे यवत येथे महामार्गालगत आर.के.ट्रेडर्स नावाने काच विक्रीचे दुकान आहे. मागील काही वर्षांत त्यांनी व्यवसायात चांगला जम बसविला होता. तसेच गावातील विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांत त्यांचा सक्रिय सहभाग असायचा
चौकट :-
पुणे-सोलापूर महामार्गावर चौपदरीकरण करताना भुयारी मार्ग चुकीच्या ठिकाणी केल्याने अद्यापपर्यंत अनेक नागरिकांना त्यांचा जीव गमवावा लागला आहे. हा भुयारी मार्ग योग्य ठिकाणी व्हावा यासाठी यापूर्वी देखील अनेक वेळा मागणी झाली आहे. नागरिकांना जीव धोक्यात घालून महामार्ग ओलांडावा लागत असल्याने लवकर यावर महामार्ग प्राधिकरणने मार्ग काढणे आवश्यक बनले आहे.
फोटो : प्रकाश वरूडकर
250921\20210925_182156.jpg
प्रकाश वरूडकर