शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
4
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
5
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
8
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
9
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
10
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
11
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
12
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
13
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
14
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
15
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
17
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
18
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
19
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
20
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...

अपुऱ्या जीवरक्षकांमुळे अपघाताचा धोका

By admin | Published: April 18, 2017 2:36 AM

आकुर्डी रेल्वे स्टेशनलगत प्राधिकरणामध्ये असणाऱ्या श्री छत्रपती शिवाजीमहाराज जलतरण तलावामध्ये लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत पोहण्यासाठी गर्दी होत आहे

रावेत : आकुर्डी रेल्वे स्टेशनलगत प्राधिकरणामध्ये असणाऱ्या श्री छत्रपती शिवाजीमहाराज जलतरण तलावामध्ये लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत पोहण्यासाठी गर्दी होत आहे. परिसरात एकच तलाव असल्यामुळे येथे पोचण्यास येणाऱ्या नागरिकांची संख्या जास्त आहे. तलावाच्या नियमाप्रमाणे हद्दीतील नागरिकांनाच पोहण्यासाठी परवानगी आहे; परंतु पालिका हद्दीबाहेरील नागरिकांची संख्या जास्त असल्यामुळे पालिका हद्दीतील नागरिकांना पोहण्यास अडचणी निर्माण होत आहेत.पहाटे ६ ते ९.४५ व दुपारी २.३० ते सायंकाळी ६.१५ पर्यंत खुला असतो. या वेळेत दररोज किमान ६०० ते ७०० जण या ठिकाणी पोहण्याचा आनंद घेत असतात. सध्या येथे ना क्रीडा शिक्षक ना पुरेसे प्रशिक्षक अशी स्थिती पहावयास मिळत आहे. नियमाप्रमाणे पोहणाऱ्यांची आणि प्रशिक्षकांची १:२५ या प्रमाणात विभागणी करण्यात येत असते. म्हणजेच एका वेळेस केवळ 50 व्यक्तींना प्रवेश देणे अपेक्षित असताना येथे मात्र एकावेळी १०० व्यक्तींना त्यांचा जीव धोक्यात घालून प्रवेश दिला जातो. नकळत जर एखादी दुर्घटना घडली, तर याला जबाबदार कोण असा प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहेत. तलावाची क्षमता पाहता व दिवसेंदिवस पोहणाऱ्यांची वाढणारी संख्या लक्षात घेता आणखी जीवरक्षकांची नियुक्ती करणे आवश्यक आहे. मोठ्या तलावालगत १२ वर्षांपेक्षा लहान मुलांसाठी तयार करण्यात आलेला बेबी तलाव गेल्या दोन वर्षांपासून दुरुस्तीच्या नावाखाली बंद असल्यामुळे लहान मुलांना इतरांसोबत पोहण्याची अडचण निर्माण होत आहे. याबाबत व्यवस्थापकांशी संपर्क साधला असता, ते म्हणाले की बेबी तलाव लिकेज असल्यामुळे बंद आहे. याबाबत पालिका प्रशासनास कळविण्यात आले आहे. महिलांसाठी स्वतंत्र चेंजिंग रूम व बाथरूमचे दरवाजे तुटलेल्या अवस्थेत आहेत. तसेच पाणीपुरवठा करणाऱ्या टाकीशेजारी असणारे चेंबर उघड्या अवस्थेत असल्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे. जीवरक्षकांच्या विश्रांतीसाठी असणारी खोली आणि तलावासाठी पाणीपुरवठा व फिल्टरेशन याकरिता एकच खोली आहे. त्या खोलीची भिंत पाडून पाइप सोडण्यात आले आहेत. तलावात उतरण्यासाठी असणाऱ्या शिड्या निखळण्याच्या स्थितीत आहे.शहरातील इतर तलावाच्या मानाने तिकिटाचे दर कमी असल्यामुळे देहू, देहूरोड, चिंचवड, प्राधिकरण, आकुर्डी, वाल्हेकरवाडी,रावेत आदी परिसरातून पोहण्यासाठी नागरिक येत असतात. प्रत्येक व्यक्तीस ३० मिनिटांकरिता १० रु आकारणी केली जाते. जी इतर तलावाच्या मानाने खूपच कमी आहे. तलावामध्ये बसविण्यात आलेल्या फरशा तुटलेल्या अवस्थेत असल्यामुळे पोहताना पायास जखम होते. तसेच ओव्हर फ्लो होणाऱ्या पाण्याच्या गटाराच्या बाजूने अनेक ठिकाणी कठडे तुटल्यामुळे पोहणाऱ्याच्या हाताला इजा होतात. जीवरक्षकासाठी असणाऱ्या खोलीमध्ये इतर साहित्याची ठेवण केल्यामुळे जीवरक्षकांना उघड्यावरच विश्रांती घ्यावी लागते. सकाळी ९ ते ९.४५ व दुपारी २.३० ते ३.१५ ही वेळ केवळ महिलांसाठी राखीव आहे. या वेळेत अनेक महिला पोहण्यासाठी येतात; परंतु महिलांसाठी महिला जीवरक्षकाची नियुक्ती नसल्यामुळे पुरुष जीवरक्षक महिलांच्या वेळेत उपस्थित असतात. त्यामुळे महिलांना पोहताना संकोचित होते, असे महिलांचे म्हणणे आहे.महिलांसाठी स्वतंत्र महिला जीवरक्षकाची नियुक्ती करावी, अशी मागणी येथे येणाऱ्या महिलांनी वारंवार पालिका प्रशासनाकडे करूनसुद्धा प्रशासन महिलांच्या या मागणीकडे दुर्लक्ष करीत आहे. (वार्ताहर)दररोज विविध राजकीय पदाधिकाऱ्यांकडून त्यांच्या कार्यकर्त्यांना मोफत सोडण्याकरिता येथील कर्मचाऱ्यांवर दबाव टाकला जातो. त्यामुळे सुद्धा मिळणाऱ्या उत्पन्नामध्ये घट होत आहे. जे नागरिक तिकिटासाठी तासन्तास उन्हामध्ये उभे राहून तिकीट मिळविण्यासाठी प्रयत्न करतात, त्यांना मात्र अशा फुकट्यांमुळे तिकीट मिळत नाही. पालिकेने सुरक्षारक्षक नेमावेत गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी नेमण्यात आलेले सुरक्षारक्षक हे ठेकेदारांचे असल्यामुळे तिकीट विक्रीच्या वेळी गर्दीवर नियंत्रण ठेवण्याऐवजी अर्थकारण करीत गुपचूप नागरिकांना आत सोडले जाते. त्यामुळे मिळणाऱ्या उत्पन्नात दिवसेंदिवस घट होत आहे. नागरिकांना उन्हात थांबावे लागते : तिकीट विक्री सुरू होण्यापूर्वी नागरिक भर उन्हात अनेकवेळा ताटकळत उभे असतात. त्यांच्यासाठी तिकीट विक्रीसमोर सावली करून देणे गरजेचे आहे.