मंचर-शिरूर हा आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात जाणारा जवळचा रस्ता आहे. या रस्त्यावरून दिवसभरात पहाटे पाचपासून ते रात्री एकपर्यंत १५०० ते २००० वाहनांची ये-जा होत असते. पूर्व भागात भीमाशंकर सहकारी साखर कारखानावर जाणारी वाहने, दूध वाहतूक करणारे टँकर, भाजीपाला टॅम्पो, खासगी कंपन्यांच्या बसेस, एस.टी.बस, रिक्षा इत्यादी गाड्यांची ये-जा होत असते. मागील वर्षी मंचर ते गावडेवाडी रस्त्याचे रुंदीकरण करण्यात आल्यानंतर गावडेवाडी, डेरेआंबा एस.टी. बसथांबा जवळ रस्त्यालगत विहीर आहे. विहीर रात्रीच्या वेळी लक्षात येत नसल्याने छोटे-मोठे अपघात होण्याची शक्यता आहे. तरी बांधकाम विभागाने विहिरीलगत संरक्षक काठाडे बांधावेत, अशी मागणी वाहन चालक करीत आहेत.
गावडेवाडी, डेरेआंबा रस्त्यालगत असलेल्या विहिरीला संरक्षक कठडे नसल्याने अपघात होण्याची शक्यता आहे.