शहरं
Join us  
Trending Stories
1
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
2
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
3
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
4
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
5
ज्यांच्या बळावर मतदान, त्यांचाच हिरावला अधिकार; दोन हजार पोलिसांचे बॅलेटच आले नाहीत
6
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
7
हल्ले, मारहाणीच्या घटनांनी राजकीय वातावरण तापले; प्रचारादरम्यान काय-काय घडलं?
8
३५ हजार पोलिसांचा फौजफाटा मुंबईत सज्ज; चार हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई
9
मुंबईकरांना पहाटेच भाजीपाला पोहोचणार; धान्य, मसाला, फळ मार्केट राहणार बंद
10
वरळीतील १,३३९ मतदारांच्या सोयीसाठी; चक्क उड्डाणपुलाखाली दोन मतदान केंद्रे
11
मतदान शांततेत पार पाडा, जबाबदारी निभावा; पोलिस महासंचालक संजय वर्मा यांचे आवाहन
12
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
13
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
14
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
15
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
16
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
17
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
18
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
19
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
20
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'

कात्रज भागात गोळीबार करणारे आरोपी गजाआड; भारती विद्यापीठ पोलिसांची कारवाई 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2020 6:50 PM

सातारा भागात सापळा रचून पकडले आरोपी

कात्रज: कात्रज भागातील शनीनगर भागात मागील भांडणाचा राग मनात धरून गोळीबार करत कोयत्याने मारहाण करणारे कुख्यात गुंड गणेश पवार यांच्या टोळीतील दोन आरोपींना भारती विद्यापीठ पोलिसांनी सापळा रचुन अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,१० डिसेंबर रोजी कात्रज भागातील कुख्यात गुन्हेगार गणेश पवारच्या टोळीतील साथीदाराने मागील भांडणाचा राग मनात धरून सिद्धिक शेख यांना जीवे मारण्याच्या उद्देशाने गोळीबार केला होता . तसेच कोयत्याने,हाताने व दगडाने मारहाण करत भागामध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला होता.भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल झालेला आहे.

भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर,पोलीस निरीक्षक अर्जुन बोत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नितिन शिंदे व त्यांच्या टीमने या गुन्हेगाराचा शोध घेण्यास सुरुवात केली होती.पोलीस पथकातील सर्फराज देशमुख व सचिन पवार यांना खबऱ्यामार्फत या टोळीतील आरोपी सोन्या कांबळे व विशाल सोमवंशी हे सातारा भागातील सुरुस फाटा येथे असल्याची माहिती मिळाली.भारती विद्यापीठ पोलिसांनी वेळ न दवडता पोलीस उपनिरीक्षक नितीन शिंदे,संतोष भापकर,सोमनाथ सुतार,रविद्र भोसले,अभिजित जाधव,गणेश शेंडे,राहुल तांबे,विक्रम सावंत यांच्या पथकाला आरोपीला पकडण्यासाठी रवाना केले.

आरोपीकडे हत्यार असणार याची माहिती पोलिसांना होती,तरीही मोठ्या शिताफीने स्वताच्या जीवाची पर्वा न करता पोलिसांनी सिनेस्टाईल सापळा रचून आरोपींना अटक केली.यावेळी आरोपींनी पळुन जाण्याचा प्रयत्न देखील केला. मात्र त्यांना यात यश आले नाही.आरोपीकडे पोलिसांना एक गावठी पिस्तुल व एक जिवंत काडतूस मिळाले आहे.यातील आरोपी सोन्या कांबळे याने आपण गणेश पवार याच्या सांगण्यावरून फायरींग केली असल्याची कबुली पोलीसांना दिली आहे.पुढील तपास भारती विद्यापीठ पोलीस करीत आहेत.

टॅग्स :Puneपुणेkatrajकात्रजArrestअटकFiringगोळीबारPoliceपोलिस