पुणे : कोथरूडमधील उद्योजकाचे खंडणीसाठी अपहरण करणाºया गुन्हेगारांना खंडणीविरोधी पथकाने अटक केली. त्यांच्यावर मोक्काअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा, जबरी चोरी, खंडणीसाठी अपहरण असे अनेक गुन्हे आरोपींवर दाखल आहेत.सुहास पन्नालाल बाफना (वय ५१ रा. कुमार पद्मजा सोसायटी, कोथरूड) या उद्योजकाचे ५० लाख रुपयांच्या खंडणीसाठी चार व्यक्तींनी ५ सप्टेंबरला अपहरण केले होते. पुणे पोलीस आणि सांगलीच्या स्थानिक अन्वेषण विभागाने (एलसीबी) संयुक्तरीत्या केलेल्या कारवाईमुळे आरोपींनी बाफना यांची सुटका केली. दरम्यान २०१० मध्येही या उद्योजकाचे अपहरण करण्यात आले होते.तपासादरम्यान चांदेकर याने संघटित गुन्हेगारी टोळी तयार करून टोळीतील सक्रिय सदस्यांच्या आर्थिक फायद्यासाठी गुन्हा केल्याचे निष्पन्न झाल्याने त्याच्यासह इतर सदस्यांवर मोक्का कायद्याअंतर्गत जादा कलमाचा जादा अंतर्भाव करण्याकरिता प्रस्ताव वरिष्ठ पोलीस निरीक्षक रघुनाथ जाधव यांनी अपर पोलीस आयुक्तांना दिला होता. त्यानुसार कलमाचा जादा अंतर्भाव करण्याकरिता पूर्वमान्यतेचा आदेश देण्यात आला. पुढील तपास गुन्हे शाखेचे सहायक पोलीस आयुक्त समीर शेख करीत आहेत.खंडणीविरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक रघुनाथ जाधव, सहायक पोलीस निरीक्षक सुनील गवळी, सहायक पोलीस निरीक्षक विठ्ठल शेलार, पोलीस कर्मचारी अविनाश मराठे, सुधीर इंगळे, प्रमोद मगर, मंगेश पवार, हनुमंत गायकवाड, धीरज भोर, रमेश गरूड, शिवाजी घुले, संतोष मते, भाऊसाहेब कोंढरे, फिरोज बागवान, सचिन अहिवळे, रणजित अभंगे, एकनाथ कंधारे, प्रदीप शिंदे, नारायण बनकर, शिवरंग बोले यांनी केली आहे.
खंडणीखोर गुन्हेगारांवर मोक्का, खंडणीविरोधी पथकाची कारवाई : उद्योजकाचे ५० लाखांच्या खंडणीसाठी केले होते अपहरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2017 6:43 AM